Ajinkya Rahane withdrew from County Championship: अलीकडेच अजिंक्य रहाणेचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल २०२३ च्या मोसमात, अजिंक्य रहाणेने चेन्नई सुपर किंग्जसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसापूर्वी कौंटी क्रिकेटमधूनही माघारी घेतली होती. याबाबतआता अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे.
अजिंक्या रहाणेने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, पुढील रणनीती काय असेल? अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, गेल्या ४ महिन्यांत तो खूप क्रिकेट खेळला आहे. पण आता आगामी देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामासाठी शरीराला रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे कौंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघारी घेतली आहे.
कौंटी क्रिकेटपेक्षा मी भारतीय देशांतर्गत हंगाम खेळू इच्छितो –
अजिंक्य रहाणेने लिहिले आहे की, तो देशांतर्गत हंगामासाठी स्वत:ला तयार करत आहे. अजिंक्य रहाणे लिहितो की, मला देशांतर्गत हंगामात मुंबईचे प्रतिनिधित्व करायचे आहे, त्यासाठी मी माझ्या शरीरावर मेहनत घेत आहे. मला जेवढ्या संधी मिळाल्या, ही माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. सध्या माझे लक्ष ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामावर आहे. तसेच, मी कौंटी क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, कारण मला भारतीय देशांतर्गत हंगामाचा भाग व्हायचे आहे.
हेही वाचा – IND vs WI: “वेगवेगळ्या गोलंदाजांसाठी माझ्या…”; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर संजू सॅमसनची प्रतिक्रिया
अजिंक्य रहाणे कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायरचा भाग –
वास्तविक, अजिंक्य रहाणे कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायरकडून खेळणार होता, पण आता या खेळाडूने आपला निर्णय बदलला आहे. अजिंक्य रहाणे कौंटी क्रिकेटऐवजी भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणार आहे. अजिंक्य रहाणे म्हणाला की, मी लीसेस्टरशायरच्या सतत संपर्कात आहे. तसेच बदलत्या परिस्थितीबद्दल त्यांना खूप माहिती आहे. याशिवाय आगामी काळात तो नक्कीच लीसेस्टरशायरकडून खेळेल, अशी आशा भारतीय फलंदाजाने व्यक्त केली आहे.