पालेकेले : विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाबाबत मी आनंदी आहे. आम्ही आमचा सर्वात संतुलित संघ निवडला आहे, असे भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. मंगळवारी श्रीलंकेत पत्रकार परिषद घेत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर केला. यावेळी रोहितही उपस्थित होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘आम्ही खूप विचार केला आणि त्यानंतरच या संघाची निवड केली. आम्ही सर्वोत्तम संघ निवडला आहे,’’ असे रोहितने सांगितले. या संघात हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा यांच्यासह अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर या अष्टपैलूंना स्थान मिळाले आहे. याबाबत विचारले असता रोहित म्हणाला, ‘‘आम्हाला गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागांत योगदान देऊ शकतील असे खेळाडू हवे होते. आठव्या आणि नवव्या क्रमांकावर खेळणाऱ्या फलंदाजांचे योगदान निर्णायक ठरू शकते. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात (पाकिस्तानविरुद्ध) आम्हाला अखरेच्या षटकांत धावा कमी पडल्या. आम्हाला तळाच्या फलंदाजांकडून अधिक धावा अपेक्षित आहेत. त्या सामन्यात आणखी १०-१५ धावांनी मोठा फरक पडला असता. या धावा विजय आणि पराभवातील अंतर ठरवू शकतात. आम्ही याबाबत आमच्या गोलंदाजांशी चर्चा केली आहे.’’