Team India Head Coach Gautam Gambhir Press Conference : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून अचानक वगळण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका २ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळवली जाईल. रवींद्र जडेजा, टी-२० आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता टीम इंडियासाठी फक्त कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटसाठी उपलब्ध आहे. रवींद्र जडेजाची निवड न करण्यावर अजित आगरकर यांनी खुलासा केला आहे.

निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर काय म्हणाले?

सोमवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलेले नाही. अजित आगरकर म्हणाले, “रवींद्र जडेजाला वनडे संघातून वगळण्यात आलेले नाही. एवढ्या छोट्या मालिकेसाठी त्याला आणि अक्षर पटेल दोघांनाही घेण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला माहित आहे की रवींद्र जडेजा कसा खेळाडू आहे?त्याने टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. त्याला वनडे संघातून वगळण्यात आलेले नाही.”

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
rbi Sanjay Malhotra
‘सतर्क राहून, कुशलतेने आव्हानांचा सामना’, नव्या गव्हर्नरांचे धोरणसातत्यावर भर राखण्याचे प्रतिपादन
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

अजित आगरकर म्हणाले, “आपल्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, पण जर रवींद्र जडेजाला अक्षर पटेलसह घेतले असते, तर तीनही सामने कोणत्याही एकाच खेळाडूने खेळले असते. आपल्या पुढे १० कसोटी सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये रवींद्र जडेजा बहुतेक सामने खेळणार आहे. त्यामुळे या तिन्ही सामने न खेळल्याने काही फरक पडत नाही. रवींद्र जडेजाला वगळण्यात आलेले नाही. तो अजूनही आमच्या रणनीतीमध्ये आहे आणि तो खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.”

हेही वाचा – Gautam Gambhir : केकेआरला चॅम्पियन बनवणाऱ्या त्रिकुटाची टीम इंडियात एन्ट्री! गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोणाला मिळाली संधी?

२७ जुलैपासून श्रीलंका दौऱ्याला होणार सुरुवात –

२७ जुलैपासून श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर २८ आणि ३० जुलैला आणखी दोन टी-२० सामने होतील. सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. यानंतर कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर २, ४ आणि ७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामने खेळवले जातील. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त झालेला रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया:

टी-२० संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

हेही वाचा – Ajit Agarkar : …म्हणून ऋतुराज-अभिषेकला भारतीय संघातून वगळले; अजित आगरकरांनी सांगितले कारण

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.

Story img Loader