Team India Head Coach Gautam Gambhir Press Conference : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाल्यापासून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माची भारतीय संघात निवड का करण्यात आली नाही, याबाबत बरीच चर्चा झाली होती. ऋतुराज आणि अभिषेकने झिमाब्वेविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी या दोघांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आता निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कोच गौतम गंभीर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांची निवड न करण्याबाबतही बराच वाद झाला होता. झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-२० मालिकेत शतक झळकावणाऱ्या अभिषेकला संधी द्यायला हवी होती, अनेक माजी क्रिकेटपटू म्हणाले होते. त्याचबरोबर या मालिकेत चांगली फलंदाजी करणाऱ्या ऋतुराजलाही संधी मिळायला हवी होती. बद्रीनाथपासून श्रीकांतपर्यंत ऋतुराजचा संघात समावेश न केल्याने नाराजी व्यक्त केली होती.

आम्ही फक्त १५ खेळाडू निवडू शकतो –

श्रीलंका दौऱ्यापूर्वी अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अभिषेक आणि ऋतुराजसारख्या खेळाडूंना चांगली कामगिरी करूनही संधी न मिळाल्याबद्दल आगरकर म्हणाले, “संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला वाईट वाटेल. पण आमचे काम फक्त १५ खेळाडना निवडण्याचे आहे. रिंकूकडेच बघा, टी-२० वर्ल्ड कपपूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती, पण त्याला टी-२० संघात स्थान मिळवता आले नव्हते. आम्ही फक्त १५ खेळाडू निवडू शकतो.”

हेही वाचा – Gautam Gambhir : ‘त्याच्याशी माझे नाते टीआरपी आणि हेडलाईनसाठी नाही…’, विराटबरोबरच्या संबंधावर गौतम गंभीरने सोडले मौन

वास्तविक, श्रीकांत आणि बद्रीनाथ यांनी टी-२० मध्ये अभिषेक-ऋतुराजचा समावेश करण्याऐवजी शुभमन गिलला उपकर्णधार म्हणून समावेश करण्यावर टीका केली होती. झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुबमनला श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी-२० संघाचा बनवण्यात आले.

हेही वाचा – Ajit Agarkar : हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादव का झाला टीम इंडियाचा कर्णधार; अजित आगरकर यांनी स्पष्टच सांगितलं कारण

या निर्णयाबाबत आगरकर म्हणाले, “शुबमन गिल हा तीन फॉरमॅटचा खेळाडू आहे असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरात त्याने दर्जेदार कामगिरी केली आहे. हे आम्ही ड्रेसिंग रूममधूनही ऐकतो. त्याने नेतृत्व करतानाही चमक दाखवली आहे. त्यामुळे आम्ही त्याला नेतृत्वाची करण्याची भूमिका देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, याबाबत आम्ही कोणतीही देऊ शकत हमी नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit agarkar opens up on abhishek sharma ruturaj gaikwad omission from team indias sri lanka tour vbm