India squad to be announced for world cup today: एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघाची मंगळवारी (५ सप्टेंबर) घोषणा होणार आहे. ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. टीम इंडिया आपला पहिला सामना ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघाची घोषणा किती वाजता होईल?

मंगळवारी दुपारी दीड वाजता संघाची घोषणा होऊ शकते. आशिया चषकासाठी संघाची निवड झाली, तेव्हा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होता. यावेळी तो तेथे असेल की नाही हे स्पष्ट नाही. बीसीसीआयचे अधिकारी संघाची घोषणा करतील. यावेळी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर दिसतील.

संघ निवडीवर काय म्हणाला रोहित शर्मा?

सोमवारी रात्री आशिया चषकात नेपाळविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माला विश्वचषक संघाबाबत प्रश्न विचारण्यात आला. समालोचक संजय मांजरेकर यांनी संघाबद्दल विचारले असता, भारतीय कर्णधार म्हणाला, “आम्ही आशिया चषक खेळण्यासाठी आलो, तेव्हाच आम्हाला माहित होते की विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघात कोण असेल.” आशिया चषकाच्या दोन सामन्यांमध्ये सर्व काही स्पष्ट होणार नाही, हे आम्हाला माहीत होते कारण संघ निवडीपूर्वी आम्हाला फक्त दोन सामने खेळायचे होते.”

हेही वाचा – IND vs NEP: पावसामुळे सामना थांबताच हार्दिक पांड्याने दिली अजब रिॲक्शन, अंपायर्सबरोबर केलेल्या मजामस्तीचा VIDEO व्हायरल

हे खेळाडू आशिया कप संघातून होऊ शकतात बाहेर –

आशिया चषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू न शकलेल्या केएल राहुलची विश्वचषकासाठी निवड होणे निश्चित आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. आशिया चषकासाठी निवड झालेला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांच्या पदरी निराशा येऊ शकते. या तिघांनाही विश्वचषक संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

केएल राहुलची झाली होती शस्त्रक्रिया –

केएल राहुलच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो मैदानाबाहेर आहे. आशिया चषकासाठी संघाची घोषणा करताना आगरकरने पत्रकार परिषदेत राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले होते. याच कारणामुळे बॅकअप म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली. आगरकरने आधीच संकेत दिले होते की, निवड समिती आशिया चषकासाठी निवडलेल्या १७ सदस्यीय संघातून विश्वचषक संघाची निवड करेल.

हेही वाचा – IND vs NEP: विराट कोहलीने नेपाळी गाण्यावर धरला ठेका, जबरदस्त डान्सचा VIDEO व्हायरल

२७ सप्टेंबरपर्यंत संघात केले जाऊ शकतात बदल –

आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांचा संघ घोषित करायचा आहे. २७ सप्टेंबरपर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप २०२३ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत संघ निश्चित करण्यात आला. आता संघात निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit agarkar will announce the indian team for the world cup 2023 today at 1 and half pm vbm