Team India Head Coach: भारतीय क्रिकेट संघ टी-२० विश्वचषकानंतर स्थित्यंतराच्या काळातून जाणार आहे. कारण सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आणि सोबतच सपोर्टिंग स्टाफही बदलणार आहे. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या जागी आयपीएल २०२४ चा विजेता कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज सादर करणारा गौतम गंभीर हा एकमेव अर्जदार आहे आणि सध्या क्रिकेट समितीकडून त्याची मुलाखत घेतली जात आहे. याचदरम्यान भारताच्या माजी खेळाडूने त्याला विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल एक इशार दिला आहे.

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली KKR च्या आय़पीएलमधील प्रभावी कामगिरीमुळे तो द्रविडच्या जागी पुढील भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडला जाईल, अशी दाट शक्यता आहे. गंभीर व्यतिरिक्त, भारताचे आणखी एक माजी क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमन यांनी भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पदासाठी मुलाखत दिली आहे.

chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
IND vs BAN Sanjay Manjrekar Statement on Rohit Sharma For Not Giving Bowling to Ravindra Jadeja
IND vs BAN: “रोहितला हे आकडे दाखवण्याची गरज…”, रोहित शर्मावर भडकला माजी भारतीय क्रिकेटपटू, जडेजाला गोलंदाजी न दिल्याबद्दल सुनावलं
India vs Bangladesh 2nd Test from today sport news
वर्चस्व राखण्याचे भारताचे लक्ष्य! बांगलादेशविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून; सलग १८व्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील
pakistan team hold indian flag
पाकिस्तानी संघाच्या हातात भारतीय राष्ट्रध्वज; व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण, कोणत्या स्पर्धेत घडली घटना?
Prime Minister Narendra Modi met gold medal winners in Chess Olympiad sport news
पंतप्रधानांची सुवर्णवीरांशी भेट
IND vs BAN Indian Cricketer lost his grandmother during match
IND vs BAN सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय खेळाडूवर कोसळला होता दुःखाचा डोंगर, तरीही त्याने पार पाडली जबाबदारी
Chess Olympiad Nona Gaprindashvili Cup given to India at Chennai 2022 goes missing by Indian Chess Federation
Chess Olympiad: ऑलिम्पियाड करंडक भारताकडून गहाळ, बुद्धिबळ महासंघाची बेफिकिरी, पर्यायी बक्षिस वितरीत होण्याची शक्यता

हेही वाचा – “माझा भाऊ थोडा चांगला असता…” वासिम जाफर मायकल वॉनला उद्देशून पाहा काय बोलून गेला? VIDEO व्हायरल

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीबाबत आपले मत मांडले आणि अपडेटही दिले आहेत. चोप्रा म्हणाला, “गौतम गंभीरने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी ही मुलाखत दिली आहे. गौतम गंभीरची मुलाखत ही व्हर्च्युअल पध्दतीने झाली तर डब्ल्यू.व्ही. रमण हे मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित होते आणि चांगले प्रेझेंटेशनही दिले, अशी माहिती कानावर आली. पण गौतम गंभीर या शर्यतीत आघाडीवर आहे, याची सगळीकडेच चर्चा आहे.” चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले.

हेही वाचा – T20 WC 2024: बांगलादेशच्या खेळाडूवर ICC ची कारवाई, नेपाळविरूद्धच्या सामन्यात कर्णधारासह घातलेला वाद

संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर स्थित्यंतरातून जाणाऱ्या भारतीय संघाला मॅनेज करणं गंभीरसाठी अवघड असणार आहे, कारण संघातली रोहित शर्मा, विराट कोहली, रवी अश्विन असे आणि इतरही काही खेळाडू ३० पेक्षा अधिक वर्षांचे आहेत आणि त्यांची व्हाईट बॉल चेंडूमधील भूमिका कशी असणार आहे आणि आगामी २०२७ साठी संघबांधणी करणं हे मोठं काम नव्या कोचसमोर असणार आहे.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

भारतीय संघाविषयी पुढे सांगताना चोप्रा म्हणाले,”हा स्थित्यंतराचा काळ आहे. संघातले बरेचसे खेळाडू तिशीपल्याड आणि काहीतर पस्तिशीपल्याड आहेत. त्यामुळे संघाची नव्याने बांधणी करावी लागेल. पुढील तीन ते चार वर्षांत, जेव्हा २०२७ विश्वचषक येईल, त्यासाठी तुम्हाला तुमचा संघ तयार करायचा आहे. २०२७ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा रोडमॅप तयार करण्याची जबाबदारी असणार आहे.”