Akash Chopra has been cheated of 33 lakh rupees: आयसीसी विश्वचषकादरम्यान क्रिकेट समालोचक आकाश चोप्रासोबत मोठी फसवणूक झाली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने त्यांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आकाश चोप्राने माजी अधिकारी कमलेश पारीख आणि त्यांचा मुलगा ध्रुव पारीख यांच्याविरोधात आग्राच्या हरिपर्वत पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?

आकाश चोप्राने क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी आणि त्याच्या मुलावर आरोप करत चप्पलांचा व्यवसाय करण्यासाठी माझ्याकडून ५७.८० लाख रुपये उसने घेतल्याचे सांगितले. मी पैसे उसने दिले, पण नंतर त्यांनी सर्व पैसे परत केले नाहीत. त्यांनी फक्त २४.८० लाख रुपये परत केले आहेत. याबाबत आकाश चोप्रा यांनी फिर्याद दिली आहे. आकाशने पोलिसांना सांगितले की, आग्रा येथील पारिख स्पोर्ट्स अँड शॉप हे ध्रुव पारीख आणि त्याचे वडील कमलेश पारीख यांच्या मालकीचे आहे. हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी पैसे उधार घेतले होते.

minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
dhfl scam of wadhawan family
घोटाळ्यांचे घराणे (डीएचएफएल)
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
ca ambar dalal
अंबर दलाल प्रकरणात २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ११०० कोटींचा गैरव्यवहार

हेही वाचा – World Cup 2023: प्रसिध कृष्णा पाठोपाठ ‘या’ स्टार खेळाडूला लागली लॉटरी, बीसीसीआयने उपकर्णधारपदी केली नियुक्ती

३० दिवसांत पैसे परत करण्याचा केला होता दावा –

आकाश चोप्राने सांगितले की, पैसे घेताना ध्रुव पारीख यांच्या मुलाने २० टक्के नफ्यासह ३० दिवसांत सर्व पैसे परत करू, असे आश्वासन दिले होते. त्यासाठी लेखी करारही झाला होता, परंतु एक वर्षानंतर, आजपर्यंत केवळ २४.८० लाख रुपये परत केले आहेत. याबाबत आकाशने त्याचे वडील कमलेश यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सर्व पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र आता दोघेही फोन उचलत नाहीत. याबाबत पोलिसांनी योग्य ती कारवाई करून सर्व रक्कम आकाश चोप्राला परत करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.