Akash Chopra has raised a question on Rohit Sharma resting Virat: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडिया २०२३ च्या आशिया कपचाही भाग आहे. भारत सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत असून पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात रोहित-विराटला विश्रांती देण्यात आली होती. आता यावर माजी खेळाडू आकाश चौप्राने सवाल उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या एकदिवसीय रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्मा आणि कोहलीला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देणे अनेक दिग्गज खेळाडू आणि चाहत्यांना पटले नाही. आता क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

भारताच्या रणनीतीबाबत आकाश चोप्राचे वक्तव्य –

माजी खेळाडूने आकाश चोप्राने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला बाहेर ठेवण्याच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने खराब फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाने वेस्ट इंडिजला हलक्यात घेतले, असे आकाश चोप्राचे मत आहे. त्यामुळेच भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महत्त्वाच्या खेळाडूंना मैदानात उतरवले नाही.

हेही वाचा – Leicestershire Team: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय, ‘या’ स्पर्धेतून घेतली माघार

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “जर हे कारण असते तर तुम्हीही अशा सामन्यात आऊट होऊ शकला असता की तुमचा संघ १५० धावांवर आऊट झाला असता. जसे तुम्ही १८१ धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने शाई होपला विश्रांती घ्यायला सांगावी का? कारण हा भारतीय संघ खूप कमकुवत आहे. माझ्या मते खरोखर कोणालाही विश्रांती देण्याची गरज नाही. कारण विश्वचषक फार दूर राहिलेला नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात काही अर्थ नाही, असे आकाश चोप्राने पुढे सांगितले. आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “दुसरा मुद्दा असा असू शकतो की खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे, भरपूर क्रिकेट खेळले गेले आणि वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे.”

हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: शुबमन गिलने रचला इतिहास! बाबर आझमला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “खरं म्हणजे जूनमध्ये एक सामना (डब्ल्यूटीसी फायनल), जुलैमध्ये दोन सामने जे सात दिवस चालले आणि एक वनडे, तर तुम्ही जुलैमध्ये एकूण ८ दिवस क्रिकेट खेळलात.” त्याचवेळी आकाश चोप्रा असेही म्हणाला की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर आशिया कपपर्यंत भारताचा एकही एकदिवसीय सामना नाही, अशावेळी कामाचा ताण आणखी कमी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra has raised a question on rohit sharma resting virat kohli in 2nd odi against wi vbm