Akash Chopra’s Playing XI for first match of World Cup: ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत असून क्रिकेटच्या या महाकुंभात भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. सर्व १० देशांनीही विश्वचषक स्पर्धेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत आणि आता सर्वांच्या नजरा प्लेइंग इलेव्हनवर आहेत. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनची बरीच चर्चा होत आहे, कारण प्लेइंग इलेव्हन फायनल करणं टीम मॅनेजमेंटसाठी अवघड काम वाटतंय. दरम्यान, भारताचा माजी फलंदाज आकाश चोप्राने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यरला मिळाले नाही स्थान –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आकाश चोप्राने सर्वात मोठा बदल केला आहे. तो म्हणजे श्रेयस अय्यरला त्यात स्थान देण्यात आलेले नाही. आकाश चोप्राच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अय्यरच्या जागी केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादवही या प्लेइंग इलेव्हनचा एक भाग आहे. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती.

अक्षर पटेलच्या जागी आर अश्विनला मिळाले स्थान –

याशिवाय आकाश चोप्राने प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याची निवड केली आहे. हार्दिक व्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जखमी अक्षर पटेलच्या जागी आकाश चोप्राने आर अश्विनला संघात ठेवले आहे. अश्विनसोबतच जडेजा आणि कुलदीप यादव हेही संघात आहेत.

हेही वाचा – Asian Games 2023: सिफ्ट कौरने विश्वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक, ५० मीटर थ्री पोझिशन रायफलमध्ये भारताने नोंदवली हॅटट्रिक

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यासाठी आकाश चोप्राची भारतीय प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

हेही वाचा – Asian Games: युवराज सिंगचा ‘तो’ विक्रम मोडणारा कोण आहे नेपाळी क्रिकेटपटू दीपेंद्र सिंग ऐरी? जाणून घ्या

विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra has selected his india playing for the first match of the odi world cup 2023 vbm
Show comments