Indian team wrong to complain about Mohammed Nabi : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यातील वादग्रस्त पराभवावर सातत्याने चर्चा सुरू आहे. क्रिकेटचे दिग्गज सातत्याने आपली मते मांडत आहेत. त्याचवेळी, आता माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने वादग्रस्त ओव्हरथ्रोवर आपले मत व्यक्त केले आहे. अफगाणिस्तानचा खेळाडू मोहम्मद नबीची चूक नव्हती, असे आकाश चोप्राचे मत आहे. भारतीय संघाने तक्रार करायला नको होती, कारण यात फलंदाजाची चूक होती असे मला वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला आकाश चोप्रा?

आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल सांगितले की, “शेवटच्या चेंडूवर लेग बायची धाव घेण्यात आली. संजू सॅमसनने थ्रो केलेला चेंडू नबीच्या पायाला लागला. त्यानंतर दोन अतिरिक्त धावा गेल्या. एक धाव होती, तिथे भारताने आणखी एक धाव दिली. कारण ते खेळाडूंबद्दल तक्रार करत होते. भारताची तक्रार चुकीची होती. तुम्ही त्यांना दोन धावांपर्यंत मर्यादित ठेवू शकला असता, पण तुम्ही तिसरीही दिली.”

वर्ल्ड कप फायनलचे दिले उदाहरण –

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “माझा प्रश्न असा आहे की, हा विश्वचषक फायनलमधील हा शेवटचा चेंडू होता असे मानू या. चेंडू पॅडवर आदळल्यानंतर तुम्हाला मिळणारी अतिरिक्त धाव ही सामन्याचा निकाल ठरवू शकते, मग कोणी का धावणार नाही? नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे म्हणून ती धाव न घेता कोणी विश्वचषक गमावण्यास तयार होईल का? कोणीही धाव घेण्याचा प्रयत्न करेल.”

हेही वाचा – इरफान पठाणने भाऊ युसूफच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

काय होते वादग्रस्त प्रकरण?

सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद नबी स्ट्राइकवर होता. मुकेश कुमारचा चेंडू मोहम्मद नबी चुकला, चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनकडे गेला. संजू सॅमसनने थ्रो केला, त्यानंतर चेंडू नबीच्या पॅडला लागला आणि बाजूला गेला, तोपर्यंत अफगाणिस्तानच्या दोन्ही फलंदाजाने पळून तीन धावा पूर्ण केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा यावर खूश नव्हता. कारण त्याच्या मते चेंडू पॅडवर लागल्यानंतर धावा घ्यायला नको होत्या. यादरम्यान नबी आणि रोहित शर्मा एकमेकांशी वाद घालताना दिसले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra reacts to the controversy surrounding mohammad nabis run after the ball hit pad in ind vs afg 3rd odi vbm