India vs Pakistan match in Cricket World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १२व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. या दोन्ही संघांत एक रोमांचत सामना होईल, अशी चाहत्यांना आशा आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर हा मेगा मॅच खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या सामन्याबाबत दोन्ही संघांचे तज्ज्ञ आणि दिग्गज आपली मते मांडत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता पाकिस्तानचा माजी अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने स्पर्धेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांवर प्रश्न उपस्थित केले. वास्तविक, एका वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात झालेल्या संभाषणात हाफिजने वर्ल्ड कपसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांवर टीका केली होती.

त्या शोदरम्यान मोहम्मद हाफिज म्हणाला होता, ‘सर्व प्रथम उद्या निर्णय घेतला जाईल की आयसीसी स्पर्धेचे आयोजन करते की बीसीसीआय. आतापर्यंत हैदराबाद, दिल्ली आणि धरमशाला या तीन ठिकाणी सामने झाले आहेत. खेळपट्टीची अवस्थाही तशीच होती आणि सामन्यादरम्यान या खेळपट्टीची वागणूकही तशीच होती. चेन्नईतील खेळपट्टी भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी वापरली जाणारी खेळपट्टी असेल, तर त्याचा अर्थ लक्षात येतो. मात्र त्यात थोडासा बदल झाला, तर स्पर्धेचे आयोजन कोण करत आहे हे समजू शकते.’

हेही वाचा – IND vs PAK, World Cup 2023: टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले लाखो चाहते, नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेरचा VIDEO व्हायरल

हाफिज पुढे म्हणाला, ‘याचा कोणताही परिणाम होऊ नये. कारण ही आयसीसी स्पर्धा आहे. त्याचे क्युरेटर आणि त्यांच्या सूचनेनुसार पालन करावे लागेल. जर खेळपट्टी आधीच्या खेळपट्टीसारखी असेल, तर त्याला अर्थ प्राप्त होतो. त्यात बदल करून तो बॅटिंग ट्रॅक झाला, तर अनेक मोठे प्रश्न निर्माण होतील.’

हाफिजच्या वक्तव्यावर आकाश चोप्राचा पलटवार –

त्याचबरोबर हाफिजच्या या वक्तव्यावर माजी भारतीय खेळाडू आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे. चोप्रा म्हणाले, ‘खेळपट्टी वेगवेगळ्या मातीपासून बनवली जाते. त्यात लाल आणि काळ्या मातीचे मिश्रण असते. यामुळे खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने व्यवहाक करते. भाऊ, चेन्नईच्या ट्रॅकवर आणि भारतातील इतर अनेक स्टेडियममध्ये आता वेगवेगळ्या मातीपासून खेळपट्ट्या बनवल्या जातात. वेगवेगळ्या मातीपासून बनवलेल्या खेळपट्ट्या वेगळ्या पद्धतीने व्यवहार करताना जाणवतात, याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे. त्यामुळे संपूर्ण विश्वचषकात एकाच ठिकाणच्या खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या पद्धतीच्या आढळल्या तर आश्चर्य वाटायला नको.’