Akash Chopra on Jasprit Bumrah: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. आता तो आयपीएल २०२३ च्या हंगामात खेळताना दिसण्याची शक्यत आहे. अशातमाजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने बुमराहबद्दल महत्वाचे विधाने केले आहे. त्याच्या मते जर मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवायचे असेल, तर त्यांना बीसीसीआयचे ऐकावे लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वारंवार झालेल्या दुखापतीमुळे स्टार फास्ट गोलंदाज बर्‍याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे तो टी-२० विश्वचषक २०२२ व्यतिरिक्त बॉर्डर-गावसकर ट्रॉफीलाही मुकला. यावर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना आणि एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे.

मुंबई इंडियन्स संघाला बीसीसीआयचे ऐकावे लागेल –

अशा परिस्थितीत, बीसीसीआय हे सुनिश्चित करू इच्छित आहे की, त्याच्या पाठीची दुखापत बुमराहच्या आयपीएलमधील पुनरागमनामुळे उद्भवू नये. हेच कारण आहे की आकाश चोप्राला असे वाटते की, जर बीसीसीआयला असे वाटत असेल की बुमराहला काही सामन्यांसाठी विश्रांती घ्यावी, तर मुंबई इंडियन्स संघाला बीसीसीआयचे ऐकावे लागेल.

हेही वाचा – Glenn Maxwell Injured: ग्लेन मॅक्सवेलला पुन्हा दुखापत; आरसीबीच्या वाढल्या अडचणी, पाहा VIDEO

मराहला काही अडचण वाटत असेल तर बीसीसीआय हस्तक्षेप करेल –

स्पोर्ट्सकिडावर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “तुम्ही पहिले भारतीय खेळाडू आहात. त्यानंतर मग तुम्ही तुमच्या फ्रँचायझीसाठी खेळता. त्यामुळे बुमराहला काही अडचण वाटत असेल तर बीसीसीआय हस्तक्षेप करेल. तसेच फ्रँचायझीला सांगेल की आम्ही त्याला मुक्त करणार नाही. तो जोफ्रा आर्चरबरोबर सात सामने खेळला नाहीत, तर जग संपणार नाही.”

तो एक राष्ट्रीय खजिना –

चोप्रा पुढे म्हणाला, “त्याच वेळी, जेव्हा आपण फिट आहात, तेव्हा आपण खेळणे सुरू ठेवू इच्छित आहात. कारण ते आपल्याला अधिक चांगले करते. म्हणून मला नक्कीच असे वाटते की, जर बीसीसीआयमध्ये हस्तक्षेप केला तर एमआय याकडे लक्ष देईल. कारण तो एक राष्ट्रीय खजिना आहे आणि गोष्टी व्यवस्थापित करणे यावेळी तितके कठीण नाही.”

हेही वाचा – Shoaib Akhtar: महेश भट्टच्या ‘या’ चित्रपटात मुख्य अभिनेत्याची मिळाली होती ऑफर: माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा खुलासा

आकाश चोप्राने असेही म्हटले की, रवींद्र जडेजाप्रमाणे जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिके खेळले पाहिजे. जर बुमराहला हवे असेल, तर ते इराणी चषक किंवा काऊन्टी क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट खेळून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळू शकतो. बीसीसीआय जसप्रीत बुमराहच्या वर्कलोडचे व्यवस्थापन कसे करेल हे पाहणे मनोरंजक असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra said if jaspreet bumrah does not play 7 matches for mi then the world will not end vbm