Akash Chopra comments on Sanju Samson’s batting numbers: ३ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संजू सॅमसन यजमानांच्या १५० धावांचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. तिथे तो केवळ १२ चेंडूत १२ धावा करू शकला आणि दुर्दैवाने धावबाद झाला. तसेच भारताला या सामन्यात ४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यावर आता भारताचे माजी सलामीवीर आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने संजू सॅमसनच्या फलंदाजी क्रमांकाबद्दल आपले मत मांडले आहे.
संजू सॅमसनबद्दल तुम्ही कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाठवणार –
जिओ सिनेमाशी झालेल्या संवादात जेव्हा हार्दिक आणि सॅमसनच्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल विचारण्यात आले. आकाश चोप्राला विचारले की हार्दिक अजून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो का? यावर आकाश म्हणाला की, जर तुम्ही त्याला त्या क्रमांकावर खेळवणार नाहीस तर कोणत्या क्रमांकावर खेळायला उतरवणार?
हार्दिकच्या फलंदाजीसाठी पाचवा क्रमांक योग्य –
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संजूच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल आकाश म्हणाला, “जर तुम्ही त्याला त्या क्रमांकावर खेळायला उतरवले नाही, तर त्याला कोणत्या क्रमांकावर खेळणार? हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर पाठवणे, मला व्यक्तिशः असे करायचे नाही. कारण मला वाटते की, हार्दिकने पाचव्या क्रमांकावर यावे. तो त्याच्यासाठी योग्य फलंदाजी क्रमांक आहे.”
हेही वाचा – IND vs WI 1st T20: युजवेंद्र चहलच्या नावावर झाला नकोसा विक्रम, एका षटकात दोन विकेट्स घेतल्या तरी…
संजूने चौथ्या क्रमांकावर खेळावे असे म्हणायला नको –
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “प्रत्येक खेळाडूला टी-२० क्रिकेटमध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायची असते, परंतु या फॉरमॅटमधील कोणत्याही फलंदाजीच्या क्रमांकावर त्याचे आकडे योग्य नाहीत. खरे सांगायचे तर संजूला खूप कमी संधी मिळाल्या आहेत. तसेच या संधी त्याला सतत मिळत नाहीत. वेगवेगळ्या फलंदाजी क्रमांकावर त्याची सरासरी २६, १६, १४, १२ आणि १९ आहे. यावरून त्याने नेमक्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करावी किंवा त्याचा योग्य फलंदाजीचा क्रम काय आहे याची कल्पना येत नाही. हे आकडे पाहता त्याने चौथ्या क्रमांकावर खेळावे असे म्हणायला नको.”