Akash Chopra Latest Video: आपल्या देशात क्रिकेटच्या क्षेत्रात टॅलेंटची कमतरता नाही. अलीकडेच, राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती एकापेक्षा जास्त चौकार आणि षटकार मारत होती. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. आता असाच एक व्हिडिओ माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आकाश चोप्राने लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला –

आता टीम इंडियाचा माजी फलंदाज आकाश चोप्राने एका लहान मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो डाव्या हाताने फलंदाजी करताना अनेक एकापेक्षा एख शॉट्स मारतो आहे. १५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये मुलगा कधी स्ट्रेट ड्राईव्ह मारत आहे, तर कधी फ्लिक शॉट्स खेळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर एक हजाराहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.

हा खेळाडू खूप पुढे जाईल – आकाश चोप्राचे मत

व्हिडिओमध्ये दोन विंडो दिसत आहेत. एकात मुलगा शॉट्स मारत आहे, तर दुसऱ्या विंडोमध्ये आकाश चोप्रा कॉमेंट्री करत आहे. तो या मुलाचे नाव शौर्य सांगत आहे आणि म्हणत आहे की हा खेळाडू खूप पुढे जाईल. या मुलाच्या फलंदाजीने केवळ आकाश चोप्राच नाही, तर ट्विटर यूजर्सचीही मने जिंकली आहेत.

आकाश चोप्रा सध्या चर्चेत –

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा सध्या चर्चेत आहे. कसोटी मालिकेत फॉर्मात नसलेल्या केएल राहुलच्या समर्थनार्थ त्याने त्याच्यावर विश्वास ठेवण्याबद्दल बोलला आहे, तर टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्याची मागणी सातत्याने करत आहे. या मुद्द्यावरून आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यात ट्विटर वॉरही पाहायला मिळाले.

हेही वाचा – Venkatesh Akash Debate: केएल राहुलबद्दल दिग्गजांमधील वाद पोहोचला शिगेला; आकाश चोप्राचे ‘हे’ ओपन चॅलेंज व्यंकटेश प्रसादने धुडकावले

आकाश चोप्राने व्यंकटेशला सोबत व्हिडिओ बनवण्याची दिली होती ऑफर –

आकाश चोप्राचा हा व्हिडिओ समोर येताच व्यंकटेश प्रसाद भडकला. त्यांने आकाश चोप्राचे एक जुने ट्विट शेअर केले, ज्यामध्ये तो रोहित शर्माला संघातून काढून टाकण्याविषयी बोलत आहे. त्याचवेळी व्यंकटेशचे हे ट्विट आकाशला फारसे पटले नाही आणि त्याने व्यंकटेशला त्याच्यासोबत यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्याची ऑफर दिली. त्यानंतर व्यंकटेश प्रसादने आकाश चोप्राची ऑफर साफ नाकारली

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra says this player will go very far watch this small child video vbm