Prithvi Shaw’s serious knee injury: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ अनेकदा चर्चेत असतो. कधी टीम इंडियामध्ये स्थान मिळवू न शकल्यामुळे, तर कधी त्याच्या फॉर्ममुळे तो नेहमीच चर्चेत असतो. त्याचवेळी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, यावेळी तो त्याच्या दुखापतीमुळे चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२३ सीझनमधील खराब कामगिरीनंतर, पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडच्या देशांतर्गत टूर्नामेंट वन डे चषक २०२३ मध्ये खेळताना दिसत होता. मात्र, गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्याबद्दल माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तो नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व करत होता. पण आता पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या स्पर्धेत द्विशतक झळकावून तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र दुखापतीमुळे तो आता पुन्हा क्रिकेटपासून दूर झाला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने पृथ्वी शॉ बाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते, कधी कधी नशिबाशी लढणं आपल्यासाठी कठीण होऊन बसतं.

पृथ्वी शॉने एक नवे वळण घेतले – आकाश चोप्रा

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की, पृथ्वी शॉने एक नवीन वळण घेतल्यासारखे वाटत होते. तो काउंटी क्रिकेट खेळायला गेला आणि तिथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होता.आकाश चोप्रा म्हणाला की, “तो खूप चांगली फलंदाजी करतो, पण आता त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा सर्व काही ठीक चालले होते, तो धावा काढत होता, नंतर त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि आता तो घरी जात आहे.”

हेही वाचा – VIDEO: “आज माझे आणि आईचे स्वप्न साकार…”; टीम इंडियाच्या फ्लाईटमध्ये बसताच रिंकू सिंगने केला आईला कॉल

त्याने पुढे सांगितले की, तो अजूनही तरुण आहे आणि त्याने इतक्या लहान वयात चढ-उतार पाहिले आहेत. आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “शॉने भारतीय संघासाठी सलामी दिली आहे, पदार्पणाच्या सामन्यात शतकही झळकावले आहे आणि त्यानंतर त्याला फ्रँचायझी क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्याने सर्व काही पाहिले आहे. आम्हाला पृथ्वी शॉकडून खूप आशा होत्या, पण कधी कधी नशिबाशी लढा देणे कठीण असते.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akash chopra statement prithvi shaw is still young and has seen ups and downs at such a young age vbm