IND vs AUS 3rd Test Updates in marathi: गाबा कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला चांगलाच त्रास दिला. एक वेळ अशी होती की ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ४४५ धावांसमोर भारताने २१३ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या, तेव्हा या जोडीने फॉलोऑन वाचवलाच पण भारताला मोठ्या पराभवाच्या धोक्यापासूनही वाचवले. आकाशदीपने सामन्याच्या पाचव्या दिवशी ट्रॅव्हिस हेडला त्रास दिला आणि यानंतर सॉरीदेखील बोलला, याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गाबा कसोटी सामना पाचव्या दिवशी सुरू झाला तेव्हा आकाशदीप आणि बुमराह ४.५ षटकं खेळू शकला आणि टीम इंडिया २६० धावांवर सर्वबाद झाली. यानंतर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होण्यापूर्वी विजा चमकून पावसाला सुरूवात झाल्याने लंच ब्रेकनंतर सामना सुरू झाला. भारचताला फॉलोऑनपासून वाचवणाऱ्या बुमराह आणि आकाशदीपने ४७ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचली. पण आकाशदीपच्या या मजेशीर घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं.

हेही वाचा – IND vs AUS: बुमराह-आकाशदीपची ऐतिहासिक भागीदारी, ७७ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

दिवसाचे दुसरे षटक टाकण्यासाठी नॅथन लायन आला. या षटकात लायनने टाकलेला चेंडू आकाशदीपच्या पॅडमध्ये जाऊन अडकला. शॉर्ट लेगच्या दिशेने उभा असलेला ट्रॅव्हिस हेड चेंडू घेण्यासाठी पुढे येत होता, आकाशदीपने त्याच्या पॅडमधून चेंडू काढला, पण त्याने ट्रॅव्हिस हेडच्या हातात चेंडू न देता तो जमिनीवर सोडला. आकाशने चेंडू खाली ठेवल्यानंतर ट्रॅव्हिस हेडची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. हेडने वैतागून त्याला लूक दिला. पण आकाशदीपने हे काही जाणूनबुजून केले नव्हते. हेडने त्याच्याकडे चेंडू घेण्यासाठी हात पुढे करताना पाहिले नसावे, म्हणूनच भारतीय खेळाडूने आपल्या कृतीबद्दल ताबडतोब माफी मागितली.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायर

आकाशदीपने ट्रॅव्हिस हेडची का मागितली माफी?

आकाशदीपने सॉरी सॉरी म्हणताच सर्व एकत्र हसू लागले. कॉमेंटेटरपासून, चाहते आणि स्वत: हेडही हसू लागला. पुढच्या षटकात ट्रॅव्हिस हेडने आकाशदीपला बाद करत भारताचा डाव २६० धावांत गुंडाळला. ७९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर आकाशदीप चेंडूचा बचाव करण्यासाठी पुढे गेला होता, पण त्याच्या प्रयत्नात तो क्रिझच्या थोडा पुढे गेला. विकेटच्या मागे तयार उभ्या असलेल्या ॲलेक्स कॅरीने वेळ न दवडता बेल्स उडवून दिले आणि त्याची ३१ धावांची शानदार खेळी संपुष्टात आणली.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा चौकार अन् गंभीर-विराटचं आक्रमक सेलिब्रेशन, भारताने फॉलोऑन टाळताच ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

पहिल्या डावात ४४५ धावा करत ऑस्ट्रेलियाने भारतावर १८५ धावांची आघाडी घेतली होती. पॅट कमिन्सने ४ आणि मिचेल स्टार्कने ३ विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी म्हणजे जोश हेजलवूडला दुखापत झाली आहे, आता तो या सामन्याचा असणार भाग नाही. ऑस्ट्रेलिया आता १० खेळाडूंसह दुसरा डाव खेळणार आहे. यासह दुसऱ्या डावात सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स गमावल्या आहेत. जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली आहे.