IND vs AUS 3rd test Day 4 Highlights in Marathi: गाबा कसोटीत भारताचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी ३९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारताचा फॉलोऑन टाळला. भारताचे टॉप फलंदाज जिथे अपयशी ठरले तिथे भारताच्या गोलंदाजांनी संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करत दिवसाअखेर नाबाद परतले. या खेळीदरम्यान आकाशदीपने एक असा काही दणदणीत षटकार लगावला की विराट कोहलीही चकित झाला आणि त्याची या षटकारावरची प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाच्या डावाच्या ७५व्या षटकात पॅट कमिन्स गोलंदाजीसाठी आला. फॉलोऑन वाचवण्यासाठी टीम इंडियाला केवळ चार धावा करायच्य होत्या. आकाशदीप कमिन्ससमोर स्ट्राईकवर होता, त्याने पहिल्या चेंडूवर बचाव केला. त्यानंतर कमिन्सने शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू टाकला आणि आकाशदीपने स्लिपमध्ये चौकार मारला. यासह भारतीय ड्रेसिंग रुममध्ये आनंदाची लाट उसळली.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा चौकार अन् गंभीर-विराटचं आक्रमक सेलिब्रेशन, भारताने फॉलोऑन टाळताच ड्रेसिंग रूममधील VIDEO व्हायरल

टीम इंडियावर १३ वर्षांनंतर फॉलोऑनचा धोका होता पण बुमराह आणि आकाशदीपने मिळून तो टाळला. यानंतर आकाशदीपने असं काही केलं की ज्याची कोणालाच अपेक्षा नसेल. कमिन्सच्या चौथ्या चेंडूवर आकाशदीपने मिड विकेटवरून लांबलचक षटकार ठोकला. आकाशदीपचा हा उत्कृष्ट षटकार पाहून विराट कोहली चकित झाला. त्याने ड्रेसिंग रूममधील त्याच्या जागेवरून उडी मारली आणि या आनंदात त्याच्या तोंडून शिवीही निघाली. विराट उठून ड्रेसिंग रूमच्या दरवाज्याजवळ आला आणि आकाशचा चेंडू वर मान करून पाहत होता. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्मा आनंदाने टाळ्या वाजवताना दिसला आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनेही त्याचं कौतुक केलं.

हेही वाचा – IND vs AUS: भारताचा फॉलोऑन टळला! बुमराह-आकाशदीपच्या जोडीने जीवाची लावली बाजी, जडेजा-राहुलने रचला होता पाया

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा कसोटीतून निवृत्ती घेणार? गाबा कसोटीत बाद झाल्यानंतर दिले संकेत; Photo होतोय व्हायरल

६६व्या षटकात रवींद्र जडेजा बाद झाल्याने आता टीम इंडियाला फॉलोऑन टाळता येणार नाही, असे चित्र होते. पण बुमराह आणि आकाशदीप ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजासाठी मात्र डोकेदुखी ठरले. दोन्ही खेळाडूंनी सुरूवातीपासूनच सकारात्मक मानसिकतेने फलंदाजी केली. बुमराहने कमिन्सच्या चेंडूवर पूल करून षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. तर आकाशदीपनेही पुढे येऊन चांगली फलंदाजी केली. इतकंच नव्हे तर दोघांनीही विकेटच्या दरम्यान कमालीच्या धावा केल्या. एक गोलंदाज कमी असल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवरील ताणही वाढला होता. पण बुमराह आणि आकाशदीप जबरदस्त फलंदाजी करत भारताला सामन्यात कायम ठेवले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akashdeep six after india avoid follow on virat kohli crazy reaction goes viral dressing room watch video ind vs aus gabba test bdg