२०१८ आशियाई खेळांसाठी भारताच्या कबड्डी संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. ४२ जणांच्या संभाव्य संघामध्ये अनुप कुमार आणि मनजीत छिल्लर या जोडगोळीला वगळण्यात आलेलं आहे. १८ ऑगस्टपासून इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या सर्व खेळाडू हरियाणातील सराव शिबीरात मुख्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सराव करत आहेत.

अनुप आणि मनजीत छिल्लरसोबतच जसवीर सिंहलाही भारतीय संघात जागा न मिळाल्याने सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. मात्र तब्बल ११ वर्षांनी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या ५ खेळाडूंना संभाव्य संघात जागा मिळाली आहे.

आशियाई खेळांसाठी भारताचा संभाव्य संघ पुढीलप्रमाणे –

मनोज कुमार, प्रवेश, अमित नागर, दर्शन, आशिष सांगवान, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, अजय ठाकूर, विशाल भारद्वाज, मोहीत छिल्लर, राजेश मोंडल, विकाश कंडोला, नितेश बी.आर., प्रपंजन, प्रशांत राय, सुकेश हेगडे, गिरीश एर्नाक, निलेश साळुंखे, रिशांक देवाडीगा, सचिन शिंगाडे, विकास काळे, महेश गौड, मनोज, मणिंदर सिंह, दिपक निवास हुडा, कमल, राजुलाल चौधरी, सचिन तवंर, वझीर सिंह, जयदीप, मोनू गोयत, नितेश, नितीन तोमर, रोहित कुमार, सुरजीत, सुरजीत सिंह, रणजीत चंद्रन, गंगाधर, अभिषेक सिंह, राहुल चौधरी, नितीन रावल आणि प्रदीप नरवाल

Story img Loader