ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी अक्षर पटेलने यावेळी अचूक मारा केला. त्याने आपल्या फिरकीच्या तालावर कांगारूंना चांगलेच नाचवले. त्यामुळेच भारताला यावेळी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला लगाम घालता आला. फिरकीपटूंनीच विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. भारताला यावेळी विजयासाठी १८७ धावा कराव्या लागतील. मात्र, त्यानंतर १४वे षटक टाकण्यासाठी आलेल्या अक्षर पटेल यांनी इंग्लिश व मागील सामन्यात वेगवान फलंदाजी करणाऱ्या मॅथ्यू वेड यांना बाद करत सामन्याला आणखी भारताच्या दिशेने आणले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या टिम डेविडने अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हैदराबादमध्ये अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ विजयाच्या निश्चयाने उतरली असून मालिका २-१ अशी जिंकण्याचा रोहित ब्रिगेडचा प्रयत्न आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅमेरून ग्रीनने तुफान फटकेबाजी करत ५ षटकात ६१ धावा करून दिल्या. १९ चेंडूत त्याने ५० धावा करत अर्धशतक साजरे केले. पण त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्यानंतर भारतीय संघ सामन्यात परत आला आहे. पहिले १० षटके ही दोन्ही संघांसाठी समसमान राहिली आहेत. आधीच्या फटकेबाजी नंतर भारतीय संघाने चार गडी बाद करत सामन्यात रंगत आणली आहे. फिरकीपटूंनी ७ ते १५ षटकांदरम्यान चांगली गोलंदाजी करत भारताला सामन्यात परत आणले.

व्हिडने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत डेव्हिडने आपले पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो बाद झाल्यानंतर उर्वरित तीन चेंडूंमध्ये केवळ एक धाव आल्याने ऑस्ट्रेलिया १८६ पर्यंत पोहोचू शकली. भारतासाठी अक्षर पटेलने सर्वाधिक तीन बळी मिळवले.