Akshay Kumar Post For Shikhar Dhawan: भारतीय फलंदाज शिखर धवनची एक सोशल मीडियावरील पोस्ट मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली आहे. शिखरने आपल्या लेकाच्या वाढदिवसाला एका वडील म्हणून व्यक्त केलेल्या भावना वाचून अनेकांनी हृदय पिळवटून गेल्याचे म्हणत कमेंट्स केल्या होत्या. शिखरच्या याच पोस्टवर प्रतिक्रिया देत आता अक्षय कुमारने सुद्धा त्याचे सांत्वन केले आहे. अक्षयने शिखर धवननेच पोस्ट केलेल्या स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर करत त्यात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नेमकी शिखरची मूळ पोस्ट काय होती व त्यावर अक्षय कुमारने काय म्हटलंय हे सगळं सविस्तर जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिखर धवनने लेकाच्या वाढदिवसाला काय पोस्ट लिहिली?

शिखर धवनची पत्नी आएशाने धवनला त्यांचा मुलगा झोरावर पासून लांब राहण्यास भाग पाडल्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला असे न्यायालयाने मान्य करत घटस्फोटाला परवानगी दिली होती. मात्र तरीही मुलाचा संपूर्ण ताबा धवनला देण्यात आलेला नाही. त्याऐवजी, धवनला मुलगा झोरावरला ठराविक कालावधीसाठी भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून धवनला लेकाशी संवाद साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र शिखरने इन्स्टाग्राम वर केलेल्या पोस्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मागील वर्षभरापासून शिखर व झोरावर भेटूच शकलेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी त्यांचे व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले होते पण तीन महिन्यांपासून शिखरला सर्वत्र ब्लॉक केल्यामुळे त्याला मुलाला साधं बघायलाही मिळत नाही. याबाबत दुःख व्यक्त करत शिखरने मुलाच्या वाढदिवसाचे निमित्त साधत शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती व वडील म्हणून आपली भावना व्यक्त केल्या होत्या.

शिखर धवन इन्स्टाग्राम पोस्ट

अक्षय कुमार काय म्हणाला?

शिखरच्या पोस्टचा फोटो शेअर करत अक्षय कुमारने लिहिले की, “ही पोस्ट वाचून मला खूपच भरून आलं. एक वडील म्हणून मी हे पूर्णपणे समजू शकतो की आपल्या मुलांना भेटता किंवा बघता न येण्याइतकं दुःख कशाचंच नाही. शिखर तू धीर धर, तू तुझ्या मुलाला लवकरच भेटू शकशील यासाठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत. देव भलं करो.”

हे ही वाचा<< MI IPL 2024: हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडून IPL खेळण्याबाबत मोठी अपडेट! दुखापतीबाबत समोर आली माहिती

दरम्यान, २०१२ साली शिखर धवन आणि आएशा मुखर्जी विवाहबद्ध झाले होते,त्यांना झोरावर धवन नावाचा १० वर्षांचा मुलगा आहे. आएशा आणि झोरावर हे दोघेही ऑस्ट्रेलियन नागरिक असून ऑस्ट्रेलियातच वास्तव्यास आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar pens down emotional post as a father for shikhar dhawan who is blocked can not see his son due to wife ayesha svs