Alastair Cook Spreads Alex Carey Rumors: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकने ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने केस कापल्यानंतर सलून चालकाला पैसे न दिल्याची अफवा पसरवल्याबद्दल माफी मागितली आहे. त्याने सांगितले होते की, कॅरी एका सलूनमध्ये गेला होता, जिथे पैसे फक्त रोखीने घेतले जातात आणि त्याच्याकडे रोख रक्कम नव्हती. कुकचे हे विधान कांगारू क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने खोटे म्हटले आहे. गेल्या महिन्यात लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर कॅरी केस कापण्यासाठी किंवा इतर कशासाठी सलूनमध्ये गेलेला नाही, असे तो म्हणाला.

खरं तर, हेडिंग्ले येथील तिसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलवर बोलताना, ॲलिस्टर कुकने एक गोष्ट सांगितली. ज्यामध्ये त्याने स्पष्ट केले की कॅरी पैसे न देता केस कापून सलूनमधून बाहेर पडला होता. तसेच त्याच्या माहितीनुसार, अजूनही ऑसी बॅट्समनने पैसे देण्याचे आश्वासन पूर्ण केलेले नाही.

ॲलिस्टर कुक म्हणाला, “सलूनमध्ये काम करणारा कामगारा म्हणाला की त्याने पैसे दिले नाहीत. हे असे दुकान आहे, जिथे फक्त कॅश स्विकारली जतो कार्ड पेमेंट स्विकारली जात नाही. त्यामुळे तो (कॅरीने) सलून बंद होण्यापूर्वी पैसे देतो म्हणाला होता. ही सत्यकथा आहे, मी ती बनवत नाहीये.”

हेही वाचा – INDW vs BANW: हरमनप्रीत कौरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताचा दणदणीत विजय, बांगलादेशला सात विकेट्सने चारली धूळ

द सनवर सलूनमध्ये काम करणाऱ्या कामगाराची प्रतिक्रिया –

लीड्समधील डॉक बार्नेटच्या सलून दुकानात काम करणारे ॲडम महमूद यांनी द सनला सांगितले, “आम्ही कार्डने पेमेंट घेत नाही आणि ॲलेक्सने सांगितले की त्याच्याकडे कॅश नाही. जवळच एक टेस्को कॅश मशीन आहे, जिथे तो जाऊ शकला असता. तो हॉटेलमधून येऊ शकला असता. यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही, परंतु त्याऐवजी तो म्हणाला की तो बदली करेल. कदाचित तो विसरला असेल. सोमवारपर्यंत पैसे दिले नाहीत तर मला बरे वाटणार नाही.

स्टीव्ह स्मिथने या अफवाचे खंडन केले –

तथापि, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ही अफवा फेटाळून लावली. त्याचबरोबर सांगितले की गेल्या महिन्यात लंडनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर कॅरीने केस कापले नाहीत आणि सलूनमध्येही गेला नाही. स्मिथ यावर म्हणाला, “मी पुष्टी करू शकतो की, आम्ही लंडनमध्ये असल्यापासून ॲलेक्स कॅरीने केस कापले नाहीत. द सनने सत्य माहिती मिळवावी.”

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: “इंग्लंड ५० षटकांच्या सामन्याप्रमाणे…”; धावांचा पाठलाग करताना स्टुअर्ट ब्रॉडचं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO

गैरसमज झाल्याबद्दल ॲलिस्टर कुकने मागितली माफी –

ॲलिस्टर कुकने शनिवारी झालेल्या गैरसमजाबद्दल माफी मागितली आहे. बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलवर तो म्हणाला, “पावसाच्या दिवशी काही गडबड झाली होती. केस कापण्याबद्दल काही बातम्याही आल्या होत्या, ज्याची कदाचित त्या दिवशी रेडिओवर चर्चा झाली. ओळखण्याच एक चूक झाली, म्हणून मी ॲलेक्स कॅरीची माफी मागतो.”