Alastair Cook Praises Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळला गेला. या सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी नावाचे वादळ आल्यासारखे वाटत होते. या २२ वर्षीय भारतीय सलामीवीराने दमदार फलंदाजी करताना इंग्लंविरुद्ध षटकारांचा पाऊस पाडला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील केवळ सातवा सामना खेळणाऱ्या युवा यशस्वीने आपले दुसरे द्विशतक पूर्ण केले. यशस्वीच्या या खेळीचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ॲलिस्टर कूकने यशस्वी जैस्वालचे कौतुक करताना त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीची तुलना राजकोट कसोटीतील भारतीय सलामीवीराच्या स्फोटक खेळीशी केली. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा हा अनुभवी खेळाडू यशस्वीबद्दल म्हणाला, ‘माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी जितके षटकार मारले नाहीत, तितके षटकार यशस्वी जैस्वालने एका डावात मारले.’ कूकने २०१८ मध्ये आपल्या १२ वर्षांच्या दीर्घ कसोटी कारकिर्दीला अलविदा म्हटले. १६१ कसोटी सामन्यांमध्ये कुकने ११ षटकारांसह ४६.९५ च्या सरासरीने १२,४७२ धावा केल्या. त्याचवेळी, यशस्वीने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात १२ षटकार ठोकले.

द्विशतक झळकावून मोडले अनेक विक्रम –

यशस्वीने राजकोटमध्ये द्विशतक पूर्ण करताच अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. सलग दोन कसोटी सामन्यांमधील हे त्याचे दुसरे द्विशतक ठरले. यासह ही कामगिरी करणारा तो विनोद कांबळी आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला आहे. या इनिंगमध्ये यशस्वीने १२ विक्रमी षटकार ठोकले. तसेच १४ चौकारांचाही समावेश होता. या मालिकेत यशस्वीने आतापर्यंत २२ षटकार मारले आहेत. कसोटी मालिकेत भारतीयाकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने रोहित शर्माला मागे सोडले. रोहित शर्माच्या नावावर एका मालिकेत १९ षटकारांचा विक्रम होता.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : “ही आजकालची मुलं…”, कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माची इन्स्टा स्टोरी व्हायरल

जेम्स अँडरसनच्या षटकात ठोकले सलग तीन षटकार –

यशस्वी जैस्वालने द्विशतकादरम्यान इंग्लंडचा सर्वात गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एका षटकात सलग तीन षटकार ठोकले. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वीने पहिला षटकार लेग साइडला, दुसरा ऑफ साइडला आणि तिसरा गोलंदाजाच्या डोक्यावरून स्ट्रेटला मारला. मात्र, तिसऱ्या दिवशी शतक पूर्ण केल्यानंतर तो रिटायर्ड हर्ट झाला. पाठीच्या समस्येमुळे तो मैदानाबाहेर गेला, मात्र चौथ्या दिवशी तो मैदानात आला तेव्हा त्याने नाबाद द्विशतक झळकावून सर्वांना प्रभावित केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alastair cook praises yashasvi jaiswal for his entire test career with his six in rajkot ind vs eng 3rd match 2nd inning vbm