Alex Carey ruled out of IND vs AUS ODI series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू आणि यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आजारी पडला असून तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.
पहिल्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी स्टीव्ह स्मिथने आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. खरे तर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी हे संघात नव्हते. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने सांगितले की, डेव्हिड वॉर्नर अजूनही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, त्यामुळे तो खेळत नाही.
स्टीव्ह स्मिथ अॅलेक्स कॅरीबद्दल म्हणाला –
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत कर्णधारपद स्टीव्ह स्मिथ सांभाळत आहे. त्याने नाणेफेकदरम्यान यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी आजारी असल्याची माहिती दिली. कर्णधार स्मिथनेही अॅलेक्स कॅरी मायदेशी गेल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच तो आजपासून सुरू झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.
स्मिथ म्हणाला, ‘अॅलेक्स कॅरी आजारी आहे, म्हणून तो घरी गेला आहे. जोश इंग्लिस आज यष्टिरक्षक म्हणून खेळणार आहे. डेव्हिड वॉर्नर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे मिचेल मार्श सलामीला येईल.’ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरला हाताला दुखापत झाली. त्यानंतर तो घरी गेला, पण त्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही.
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलिया संघाने २८ षटकानंतर ५ बाद १६९ धावा केल्या आहेत. कॅमेरुन ग्रीन १० धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर त्याला साथ द्यायला ग्लेन मॅक्सवेल आला आहे. या अगोदरट्रॅव्हिस हेडने १० चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ५ धावा केल्या. त्यानंतर स्मिथ आणि मार्श या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. त्याने ३० चेंडूत चार चौकारांच्या मदतीन २२ धावा केल्या. मार्नस लाबूशेनने १५ (२२) आणि जोश इंग्लिसने २६(२७) धावांचे योगदान दिले.
हेही वाचा – IND vs AUS 1st ODI: मोहम्मद सिराजचा धुमाकूळ! दुसऱ्याच षटकात ट्रेविस हेडला केले क्लिन बोल्ड, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आहे. त्याने ६५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने दमदार ८१ धावांची खेळी केली. या दरम्याने त्याने कर्णधारासोबत दुसऱ्या गड्यासाठी ७२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकुर वगळता इतर पाच गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.