Alex Carey’s reaction to Jonny Bairstow’s stumpout: ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीनेॲशेस २०२३ च्या लॉर्ड्स कसोटीत जॉनी बेअरस्टोला ॲलेक्स कॅरीने स्टंपिंग आऊट केले होते. त्यावरून क्रिकेट विश्वात बराच गदारोळ झाला होता. जॉनी बेअरस्टोच्या विकेटवर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया पाहिला मिळाल्या होत्या. आता जॉनी बेअरस्टोच्या विकेटवर ॲलेक्स कॅरीने मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे. कांगारू यष्टिरक्षकाने याबद्दल खुलेपणाने सांगितले की संधी मिळाल्यास तो पुन्हा असे करेल.
त्याचबरोबर ॲलेक्स कॅरीने प्रीमियर क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या सामन्याबद्दल सांगितले, जेव्हा तो १५ वर्षांचा होता आणि बेअरस्टो सारखा स्टंपिंग आऊट झाला होता. ॲशेस मालिकेबद्दल बोलायचे झाले, तर ऑस्ट्रेलिया ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने पुढे आहे. चौथी कसोटी १९ जुलैपासून खेळवली जाणार आहे.
ॲलेक्स कॅरीने मँचेस्टरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “मी अशाप्रकारे आऊट झालो आहे आणि मी याआधीही फलंदाजांना अशा प्रकारे बाद करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील माझ्या पहिल्या ए-ग्रेड सामन्यात मी अशा प्रकारे बाद झालो होतो. जेव्हा मी मैदानातून बाहेर गेलो होतो, तेव्हा माझी खूप निराशा झाली. त्यावेळी कर्णधार माझ्याकडे आला आणि म्हणाला की पुढच्या वेळी तुला तुझा पाय रेषेच्या मागे ठेवण्याची आठवण राहिल.”
हेही वाचा – IND vs WI 1st Test: विजयानंतर रोहित शर्माला आला अनारकलीचा फोन, पत्नी रितिकाने केले ट्रोल
ॲलेक्स कॅरी वारंवार क्रीज सोडत होता –
ॲलेक्स कॅरीने स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलियन संघाने बॉल डेड होण्यापूर्वी बेअरस्टोला वारंवार क्रीज सोडताना पाहिले होतो. तो म्हणाला, “त्याची पहिली हालचाल खूप क्रीजच्या बाहेर होती, म्हणून मी चेंडू पकडला आणि स्टंपवर फेकला आणि बाकी इतिहास आहे. तो (बेअरस्टो) एक महान खेळाडू आहे आणि ती मोठी विकेट होती. चेंडू हातात येताच मी स्टंपवर मारल. मग बेल्स पडल्यानंतर आऊट द्यायचे की नॉट आउट हे तिसऱ्या पंचावर अवलंबून होते.”
हे लक्षात ठेवले पाहिजे की ही ॲशेस आहे –
लॉर्ड्स कसोटीत बेअरस्टो स्टंप आऊट झाल्यानंतर खिलाडीवृत्तीवर बरीच चर्चा झाली होती. बराच गदारोळ झाला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची वक्तव्येही आली होती. हेडिंग्ले येथे इंग्लंडच्या गर्दीने कॅरीला वेठीस धरले. याबद्दल यष्टीरक्षक म्हणाला, “हे लक्षात ठेवले पाहिजे की ही ॲशेस आहे. काही वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत, पण त्याआधीही अशा गोष्टी बोलल्या जात होत्या. मला चांगला पाठिंबा मिळतो. मला वाटते की संपूर्ण गट असे करतो. मला अजूनही वाटते की इंग्लंडमध्ये आमचे बरेच चाहते आहेत. मला वाटत नाही की आम्ही काही मिळवले आहे, परंतु आम्ही काही गमावले पण नाही.”
हेही वाचा – VIDEO: लिलावात आरसीबीने खरेदी न केल्याने चहलची जाहीर नाराजी, म्हणाला, “मला कोणी..”
केस कापल्यानंतर पैसे न देण्याच्या अफवेवर कॅरीची प्रतिक्रिया –
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकने केस कापल्यानंतर पैसे न दिल्याच्या अफवेबद्दल माफी मागितल्याचेही कॅरीने स्पष्ट केले. तो म्हणाला, “मला सुरुवातीला हे थोडं मजेदार वाटलं. ती फेक न्यूज असल्याचे निष्पन्न झाले. पण हो, आम्ही लंडनला आल्यापासून केस कापले नाहीत. केस कापने आवश्यक आहे. कुकने माफी मागितली.”