Alex Carey says Pat and Mitchell good earnings in IPL 2024 : आयपीएल २०२४ साठी १९ डिसेंबर रोजी दुबई येथे झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये होते. सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या संघात खेळाडूंचा समावेश करण्यासाठी खूप पैसा खर्च केला होता. दरम्यान, कांगारू संघाचा अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज  ॲलेक्स कॅरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो लिलावात सर्वाधिक कमाई केल्याबद्दल आपल्या देशाच्या खेळाडूंना चिमटा काढण्याचा प्रयत्न करताना दिसला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियन संघ सध्या पाकिस्तानविरुद्ध मायदेशात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पर्थ कसोटी जिंकल्यानंतर यजमान संघ मालिकेत १-० ने पुढे आहे आणि संपूर्ण संघ २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. शनिवार, २३ डिसेंबर रोजी क्रिकेट डॉट कॉम एयूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या व्हिडिओमध्ये कॅरी म्हणाला, “आम्ही (स्टार्क आणि कमिन्स) १५ मिनिटांपूर्वी भेटलो होतो. लिलावात त्यांनी चांगले पैसे कमावले आणि त्यांचे खिसे भरले आहेत. मात्र, यामुळे त्यांच्या स्वभावात कोणताही बदल होणार नाही.”

ॲलेक्स कॅरी पुढे म्हणाला, “त्यांना क्रिकेट आवडते. या दोघांच्या गोलंदाजीसमोर विकेट्सच्या मागे उभे राहणे ही एक आश्चर्यकारक भावना आहे. ट्रॅव्हिस हेड काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. स्पेन्सर जॉन्सन हा देखील मी गेल्या काही वर्षांत पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. ज्या पद्धतीने त्याने आपली क्षमता संपूर्ण जगासमोर सिद्ध केली आहे, त्याचेच बक्षीस त्याला लिलावात मिळाले आहे. मला आशा आहे की माझा मुलगा बॅटऐवजी चेंडू निवडेल आणि माझ्याविरुद्ध गोलंदाजी करेल.”

हेही वाचा – BBL 2023 : जमान खानच्या धारदार यॉर्करवर ग्लेन मॅक्सवेल काही कळण्याच्या आत झाला ‘क्लीन बोल्ड’, पाहा VIDEO

उल्लेखनीय आहे की मिनी लिलावात केकेआरने मिचेल स्टार्कला २४ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी करून आपल्या संघाचा भाग बनवले होते. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा विकणारा खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २० कोटी ५० लाख रुपये खर्चून आपल्या संघात सामील केले. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेडला ६ कोटी ८० लाख रुपये खर्चून खरेदी केले. त्याचवेळी गुजरात टायटन्सने स्पेन्सर जॉन्सनला १० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले होते.

हेही वाचा – BBL 2023 : हरिस रौफ ग्लोव्हज आणि पॅडशिवाय फलंदाजीला आल्याचा VIDEO व्हायरल, काय आहे कारण? जाणून घ्या

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा दारुण पराभव पराभव केला. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ३६० धावांनी दारूण पराभव झाला होता. या कारणामुळे पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानला मोठा फटका बसला. आता पाकिस्तानचा पुढील सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. अशा स्थितीत पाकिस्तान या मालिकेत पुनरागमन करू शकणार की पहिल्या सामन्याप्रमाणे पराभवाला सामोरे जावे लागणार हे पाहावे लागेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alex carey says pat and mitchell good earnings in ipl 2024 auction wont change his attitude vbm