Alex Hales was injured after being hit by Spencer Johnson’s fast ball : आयपीएलच्या २०२४ हंगामासाठी १० कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाचा स्पेन्सर जॉन्सन बिग बॅश लीगमध्ये आपल्या गोलंदाजीने छाप पाडत आहे. बीबीएलमध्ये बुधवारी ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात स्पेन्सर जॉन्सन ब्रिस्बेन हीटसाठी चार षटकांत २४ धावांत दोन विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सरच्या एका चेंडूवर सिडनी संघाचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स दुखापतग्रस्त होऊन खेळपट्टीवर कोसळला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट्स संघ १७.४ षटकांत १७२ धावा करून बाद झाला, परंतु त्यांनी २० षटकांत सिडनी थंडर्सला १५७ धावसंख्येवर रोखले. ज्यामुळे ब्रिस्बेन हीट्सने १५ धावांनी विजय मिळवला.ब्रिस्बेन हीटच्या १७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सिडनी थंडर्सच्या डावाची सुरुवात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि ॲलेक्स हेल्स यांनी केली.

baby john movie teaser
Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, वरुण धवनच्या अ‍ॅक्शनने अन् जॅकी श्रॉफ यांच्या लूकने वेधलं लक्ष
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Viral Video: Family Throws Gas Cylinder at Neighbours Over Excessive Firecracker Noise shocking video
“क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप” फटाके फोडण्यावरून शेजारी भिडले, थेट छतावरून सिलेंडर फेकला; VIDEO व्हायरल
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE video viral
Stuart Binny : स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या षटकात पाडला ३१ धावांचा पाऊस, तरीही यूएईविरुद्ध भारताला पत्करावा लागला पराभव, पाहा VIDEO
Virat Kohli run out after Matt Henry direct hit video viral IND vs NZ 3rd Test
Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
IND vs NZ 3rd Test Mohammad Siraj replaced Jasprit Bumrah
IND vs NZ : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटी का खेळत नाहीये? कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण
Viral video of two youths tying firecrackers to a dog's tail terrifying diwali video viral on social media
माणूस नाही हैवान! श्वानाच्या शेपटीला बांधला फटाका अन्…, VIDEO चा शेवट पाहून व्हाल निशब्द

दरम्यान, जॉन्सनचा एक चेंडू वेगाने आत आला आणि ॲलेक्स हेल्सच्या पोटाच्या खालच्या भागावर आदळला. त्यामुळे हेल्स खेळपट्टीवर पडला. नंतर त्याने फलंदाजी केली पण तो आत्मविश्वासाने फलंदाजी करताना दिसला नाही. २८ धावा करून हेल्स मॅट कुहनेमनचा बळी ठरला. सिडनी थंडरसाठी, बॅनक्रॉफ्टने सर्वाधिक ४६ धावा केल्या. पण इतर फलंदाज मोठी इनिंग खेळू शकले नाहीत. त्यामुळे सिडनी थंडर्सचा डाव २० षटकांत १५७ धावांवर आटोपला.

हेही वाचा – AUS vs SA Test Series : नॅथन लायनने मोडला हरभजन आणि बेदीचा मोठा विक्रम, पाकिस्तानविरुद्ध केला खास पराक्रम

ब्रिस्बेन संघासाठी झेवियर बार्टलेटने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जॉन्सन आणि कुहनेमन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ब्रिस्बेनच्या गोलंदाजांमध्ये स्पेन्सर जॉन्सनची गोलंदाजी शानदार राहीली, त्याने चार षटकात प्रति षटकात सहा धावा देत दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीटने नॅथन मॅकस्विनीच्या ५२ चेंडूत ७३ आणि जोश ब्राउनच्या ३९ धावांच्या जोरावर १७२ धावा केल्या होत्या. सिडनी थंडर्सच्या डॅनियल सॅम्सने चार षटकांत ३० धावांत पाच बळी घेतले, तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जमान खानने दोन बळी घेतले.