क्रिकेटपटू मोहम्मद शमीचे पाकिस्तानी महिलेबरोबर संबंध आहेत असा आरोप हसनी जहाँने केला होता. हसनी जहाँ मोहम्मद शमीची पत्नी आहे. हसीन जहाँने ज्या पाकिस्तानी महिलेचा उल्लेख केला होता ती पाकिस्तानी महिला अलिश्बा अखेर समोर आली आहे. अलिश्बाने शमी दक्षिणआफ्रिका दौऱ्यावरुन परतत असताना आपण त्याला दुबईमध्ये भेटलो होतो असे सांगितले. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी ट्रॉफी स्पर्धेपासून आपण शमीच्या संपर्कात आहोत असा दावा अलिश्बाने केला आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. शमीवर अनेक आरोप करणाऱ्या हसीन जहाँने शमी मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला होता. शमीने दुबईमध्ये एका महिलेची भेट घेतली ही महिला ब्रिटनहून एका माणसाने पाठवलेले पैसे त्याला देणार होती असा आरोप केला होता. शमीला ते पैसे तिने का दिले ते शमीने मला कधीही सांगितले नाही. पण तो मला फसवू शकतो तर देशालाही फसवेल असे हसनी जहाँने म्हटले होते.
मी ब्रिटनमधल्या मोहम्मद भाई नावाच्या कुठल्याही माणसाला ओळखत नाही. माझ्यात आणि शमीमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीचा कुठलाही व्यवहार झाला नाही. हो, मी शमीला भेटले. मी नेहमीच दुबईला जात असते तिथे माझी बहिण राहते. एक व्यक्ति म्हणून शमी मला आवडतो. जेव्हा आपण कोणाचे चाहते असतो, तेव्हा त्या सेलिब्रिटीला भेटण्याची इच्छा असते. अन्य कुठल्याही चाहत्याप्रमाणे मला शमीला भेटण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे मी त्याला भेटले.
मला वाटत नाही कि, ही फार मोठी गोष्ट आहे असे अलिश्बाने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले. एक व्यक्ति म्हणून मी शमीचा आदर करते. आम्ही चांगले मित्र आहोत. दक्षिण आफ्रिकेहून परतताना दुबई मार्गे शमी येत असल्याचे मला समजले. मी सुद्धा माझ्या बहिणीला भेटायला चालले होते. योगायोगाने आमची भेट झाली असे अलिश्बाने सांगितले.