लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना आज (रविवार) फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत गतविजेत्या फ्रान्सशी भिडणार आहे. कतारमध्ये सुरू असलेला विश्वचषक हा मेस्सीचा शेवटचा विश्वचषक असेल. अर्जेंटिनाने स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केल्याने, मेस्सीचे आपल्या कारकिर्दीतील पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य असणार आहे. दुसरीकडे, फ्रान्स संघ आहे, जो ब्राझील आणि इटलीनंतर सलग विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ बनण्याचा प्रयत्न करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१.विश्वचषकात एका खेळाडूने मिळवले सर्वाधिक विजय –

मेस्सीने फिफा विश्वचषकात आतापर्यंत १६ सामने जिंकले आहेत. ज्याचा तो भाग होता. अर्जेंटिनाने फायनल जिंकल्यास हा स्ट्रायकरचा १७वा विजय असेल. ज्यामुळे तो विश्वचषक सामन्यांमध्ये संयुक्त-सर्वाधिक सामना-विजेता ठरेल. सध्या जर्मनीचा मिरोस्लाव क्लोस विश्वचषक स्पर्धेत १७ विजयांसह आघाडीवर आहे.

२.विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू –

जर मेस्सी फ्रान्सविरुद्ध अंतिम फेरीत खेळला, तर तो जर्मनीच्या लोथर मॅथ्यूस (२५ सामने)ला मागे टाकून सर्वाधिक विश्वचषक सामने खेळणारा खेळाडू बनेल.

हेही वाचा –

Fifa WC 2022 Final: लिओनेल मेस्सीच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट; फ्रान्सविरुद्ध अंतिम सामना खेळणार की नाही? घ्या जाणून

३.वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक मिनिटे खेळणारा खेळाडू –

इटलीचा दिग्गज खेळाडू पाओलो मालदिनीने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक मिनिटे (२,२१७) खेळली आहेत. मेस्सी २१९४ मिनिटे खेळला आहे. आता अंतिम फेरीत तो विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. दोघांमध्ये केवळ २३ मिनिटांचा फरक आहे.

४.विश्वचषकात सर्वाधिक असिस्ट करणारा खेळाडू –

मेस्सीने आतापर्यंत फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये एकूण नऊ असिस्ट केले आहेत. सध्या ब्राझीलचा दिग्गज पेले दहा असिस्टसह अव्वल स्थानावर आहे. जर मेस्सीने आपल्या सहकाऱ्यांना अंतिम फेरीत किमान दोन गोल करण्यात मदत केली, तर तो विक्रम आपल्या नावावर करेल.

हेही वाचा – Fifa WC 2022 Final: पैसाच पैसा… फायनलमध्ये जिंकू किंवा हरु, दोन्ही संघांना मिळणार करोडो रुपये

५.सर्वाधिक गोल्डन बॉल पुरस्कार जिंकणारे खेळाडू –

अर्जेंटिनाच्या स्ट्रायकरला २०१४ च्या विश्वचषकात गोल्डन बॉल देण्यात आला होता. आता यावेळीही तो जिंकण्याच्या दावेदारांपैकी एक आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूला गोल्डन बॉल दिला जातो. जर तो प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्यात यशस्वी झाला, तर तो दोन ‘गोल्डन बॉल्स’ जिंकणारा पहिला खेळाडू होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All eyes on lionel messi in argentina vs france fifa world cup final 2022 can break five big records vbm