आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव नुकताच जयपूरमध्ये पार पडला. २०१९ साली होणाऱ्या स्पर्धेसाठी बहुतांश संघमालकांनी महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम राखलं होतं. अनेक नवोदीत खेळाडूंना यात कोट्यवधी रुपयांच्या बोलीही लागल्या. याचसोबत काही नावाजलेल्या खेळाडूंना मात्र आपल्या संघात घेण्यामध्ये कोणीही तत्परता दाखवली नाही. न्यूझीलंडचा माजी तडाखेबाज फलंदाज ब्रँडन मॅक्युलमलाही या हंगामात कोणत्याही संघमालकाने बोली लावली नाही. मात्र या गोष्टीचं मॅक्युलमला अजिबात वाईट वाटलेलं नाहीये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच. माझ्यावर बोली लागली नसली तरीही माझ्या संघातील काही खेळाडूंना आयपीएलमध्ये यंदा संधी मिळतेय यासाठी मी आनंदी आहे. माझ्यावर बोली लागली नाही याचं मला अजिबात वाईट वाटलेलं नाही. संधी मिळालेल्या प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा आहेत, मात्र भविष्यात तुमच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल हे कोणी सांगितलंय?” Radio Sports ला दिलेल्या मुलाखतीत मॅक्युलम बोलत होता.

आयपीएलच्या पहिल्या पर्वात मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत असताना सलामीच्या सामन्यातच धडाकेबाज शतकी खेळी केली होती. गेल्या ११ हंगामांमध्ये ब्रँडन मॅक्युलमने कोलकाता नाईट रायडर्स, कोची टस्कर्स केरळ, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात लायन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून सामने खेळले. २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही मॅक्युलमन विविधी टी-२० लीगमध्ये खेळतच होता. मात्र यंदाच्या आयपीएल हंगामात त्याच्यावर बोली न लागल्यामुळे सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All good things must come to an end says brendon mccullum after ipl auction snub