R Ashwin roasted Pakistan cricket fan for trolling Nitish Reddy : रविचंद्रन अश्विनशी सोशल मीडियावर पंगा घेणे महागात पडू शकते. याचा प्रत्यय पाकिस्तानच्या एका चाहत्याला आला आहे. सध्या अश्विन क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो क्रिकेटसोबतच चाहत्यांशीही जोडलेला असतो. दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आणि यावेळी अश्विन युवा प्रतिभेवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान अश्विनने नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीची कौतुक करणारी एक क्लीप पोस्ट केली होती, ज्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी नितीश कुमारची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला, पण अश्विनने एक खास इमोजी शेअर करत त्या पाकिस्तानी चाहत्यालाच ट्रोल केले.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने बाबा इंद्रजीतच्या खेळीचे कौतुक केले. त्यानंतर त्याने इंडिया बी संघाकडून खेळणाऱ्या नितीश रेड्डीच्या गोलंदाजीची प्रशंसा करणारे ट्विट केले. त्याने नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीची एक छोटी क्लिप शेअर करत अश्विनने लिहिले की, ‘हा एनकेआर गोलंदाजीसाठी खूप योग्य दिसत आहे.’ यावर सुरुवातीला काही चाहत्यांचा एनकेआर कोण असा गोंधळ झाला होता. मात्र, यानंतर लगेच चाहत्यांनी एनकेआर म्हणजे नितीशकुमार रेड्डी असल्याचे सर्वांनी सहज ओळखले.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

मात्र, यावर एका पाकिस्तानी चाहत्याने नितीशच्या बॉलिंग ॲक्शनची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावर अश्विनने या चाहत्याला चांगलेच ट्रोल केले. अश्विनने अभिनेता आमिर खानचे ‘ऑल इज वेल’ असे मीम्स शेअर करुन प्रत्युतर दिले. काही दिवसांपूर्वी बांगलादेशविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची सातत्याने खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने खिल्ली उडवली होती.

हेही वाचा – Rahul Dravid IPL 2025 : राहुल द्रविडचे आयपीएलमध्ये पुनरागमन, ‘या’ संघाला १६ वर्षानंतर ट्रॉफी जिकून देण्यासाठी सज्ज!

रविचंद्रन अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, ‘बांगलादेशसाठी हा किती जबरदस्त विजय आहे. पण पाकिस्तानची किती निराशा झाली. हे खूपच निराशाजनक आहे कारण पाकिस्तानला पराभूत करणे सोपे नाही. पण पाकिस्तानला घरच्या मैदानावर १००० दिवसांपासून घरच्या मैदानावर जिंकता आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते भावूक आहेत.
अश्विन पुढे म्हणाला होता की, ‘तुम्हाला माहित आहे की मला कोणासाठी सर्वात वाईट वाटते? पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहाससाठी. वकार युनूस, वसीम अक्रम, शोएब अख्तर, इम्रान खान, इंझमाम-उल-हक, इजाज अहमद, सलीम मलिक, सईद अन्वर, आमिर सोहेल… मी आणखी बरीच नावे घेऊ शकतो. कारण याा देशाचा आणि त्यांच्या क्रिकेट संघाचा किती अद्भुत वारसा आहे.’

Story img Loader