भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळली जाणारी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ ते १४ फेब्रुवारी दरम्यान नागपुरातील व्हीसीए स्टेडियमवर होणार आहे.या सामन्यासाठी यजमान संघाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. मंगळवारी टीम इंडियाचे फोटोशूट झाले. ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया हे सध्या कसोटी स्वरूपातील दोन मोठे संघ आहेत. दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या गेल्या तीन कसोटी मालिका भारताने जिंकल्या आहेत. अशा स्थितीत कांगारू संघापेक्षा भारतीय संघाला मोठा फायदा आहे. दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी शेवटच्या दिवशी (८ फेब्रुवारी) टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटोशूट झाले, ज्यामध्ये सर्व खेळाडू पूर्ण उत्साहात दिसले.
टीम इंडियाच्या फोटोशूटचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले, ”लाइट्स कॅमेरा अॅक्शन. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या फोटोशूटमधील काही क्षण.”
विशेष म्हणजे आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. ही मालिका दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. नागपूरच्या टर्निंग पिचवर टीम इंडिया तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे वेगवान गोलंदाजीचे आक्रमण हाताळताना दिसण्याची शक्यता आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमेश यादव , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.