भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त २९ ऑगस्ट रोजी देशात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून विविध क्रीडा प्रकारांत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली होती.

रविंद्र जाडेजा सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या कारणासाठी गुरुवारी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्याला तो हजर राहू शकला नाही. मात्र जाडेजाने वेस्ट इंडिजवरुन एका व्हिडीओद्वारे अर्जुन पुरस्काराबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. याचसोबत देशासाठी कायम सर्वोत्तम कामगिरी करत राहिन असा आत्मविश्वासही जाडेजाने यावेळी व्यक्त केला.

अँटीग्वा येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान, जाडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली.

Story img Loader