Alzarri Joseph Fined by ICC: वेस्ट इंडिजचा खेळाडू अलझरी जोसेफ याला अजून एक धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी १० डिसेंबरला वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला मैदानावरील आणखी एका गुन्ह्याबद्दल फटकारले. गेल्या रविवारी सेंट किट्स आणि नेव्हिस येथे बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान या वेगवान गोलंदाजाला त्याच्या वागण्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे.

अल्झारी जोसेफने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद २.३ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले. आयसीसीच्या निवेदनानुसार, खेळ सुरू होण्यापूर्वी जोसेफने चौथ्या पंच ग्रेगरी ब्रॅथवेटला शिवीगाळ करताना नियमाचे उल्लंघन झाले.

bjp and ajit pawar ncp political conflict over allegations against dhananjay munde
धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस, चित्रा वाघ यांचा बोलविता धनी कोण ?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Walmik Karad Arrest
Vijay Wadettiwar : “वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करा, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे..”; काँग्रेसची मागणी
BBL 2025 Daniel Sams and Cameron Bancroft clashing Video
BBL 2025 : मैदानातच भीषण अपघात! कॅच घेण्याच्या नादात दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक, एकाच फुटलं नाक, VIDEO व्हायरल
Sameer Wankhede statement on Aryan Khan case
Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”
IND vs AUS 4th Test Surinder Khanna statement on Virat Kohli and Rohit Sharma
IND vs AUS : ‘रोहित-विराटला बाहेर करायला हिंमत लागते…’, माजी भारतीय खेळाडूचे बीसीसीआयला आव्हान

फोटो – PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार

ICC ने सांगितले की, ‘अल्झारी जोसेफने चौथ्या पंचांशी वाद घालताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली. अंपायरने अल्झारी जोसेफला स्पाइक्स घालून खेळपट्टीवर पाऊल ठेवू नये असे सांगितले होते. याबाबत बोलत असताना अयोग्य भाषेचा वापर करण्यात आला.

अल्झारी जोसेफला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि लेस्ली रेफर, तिसरे पंच आसिफ याकूब आणि चौथे पंच ग्रेगरी ब्रॅथवेट यांनी अल्झारी जोसेफवर हा आरोप केला आहे. अल्झारी जोसेफचा २४ महिन्यांतील हा दुसरा गुन्हा होता.

हेही वाचा – Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?

अल्झारी जोसेफचा त्याच्याच वेस्ट इंडिज देशाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार शाई होपशी सुमारे महिनाभरापूर्वी मैदानावर जोरदार वाद झाला होता. या कारणास्तव त्याला क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) २ सामन्यांसाठी निलंबित केले होते. ही घटना वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेदरम्यान घडली होती.

हेही वाचा – १३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज

वेस्ट इंडिजच्या घरच्या वनडे मालिकेदरम्यान अल्झारी जोसेफचा शाई होपशी वाद झाला. डावाच्या चौथ्या षटकात इंग्लिश फलंदाज जॉर्डन कॉक्स विरुद्ध केलेल्या फील्ड सेटिंगमुळे तो नाराज असताना अल्झारी जोसेफ त्याच्याबरोबर वाद घालत होता आणि वादादरम्यान त्याने त्या षटकात विकेटही मिळवली आणि धावही दिली नाही. जोसेफने आपले विकेट मेडेन षटक पूर्ण केले आणि रागारागात मैदानाबाहेर निघून गेला.त्यामुळे एका षटकासाठी वेस्ट इंडिजकडे फक्त १० खेळाडू मैदानात उरले होते. त्यानंतर अल्झारी जोसेफ ड्रेसिंग रूममधून डगआऊटवर आला आणि पुढच्या षटकानंतर पुन्हा मैदानात आला.

Story img Loader