WI vs ENG Alzarri Joseph Video: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ब्रिजटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ लाइव्ह सामन्यातच कर्णधार शाई होपवर भडकला. इतकंच नव्हे तर तो रागरागात चालू सामना सोडून षटक पूर्ण करताच मैदानाबाहेर निघून गेला. त्यामुळे संघाला काही वेळ १० खेळाडूंबरोबर सामना खेळवा लागला, पण नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊया.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ३ षटकात अवघ्या १० धावा देत पहिली विकेट मिळवला. त्यानंतर चौथ्या षटकात अल्झारी जोसेफ गोलंदाजीसाठी आला. कर्णधार शाई होपने नवीन फलंदाजासाठी दोन क्षेत्ररक्षक स्लिपमध्ये उभे केले. अल्झारीने पहिला चेंडू आऊट साइड, बॅक ऑफ लेन्थवर टाकला. यानंतर एक स्लिप काढून पॉइंटवर ठेवण्याची मागणी केली. पण होपने त्याचे ऐकले नाही. दुसरा चेंडूही ऑफ दिशेला टाकल्यानंतर अल्झारीने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. असे असतानाही कर्णधाराने फिल्ड बदलली नाही.
अल्झारी जोसेफ होपचे वागणे पाहून प्रचंड संतापला आणि तिसऱ्या चेंडूवर १४८ धावांच्या वेगाने बाऊन्सर मारून त्याने जॉर्डन कॉक्सला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॉक्सच्या विकेटनंतर जोसेफने सेलिब्रेटही केले नाही तर या विकेटनंतर अल्झारी जोसेफ आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप यांच्यात जोरदार वादावादी झाली. होपने तरीही त्याच्यानुसार फील्ड सेट केलेली तशीच ठेवली. यामुळे अल्झारीला प्रचंड राग आला आणि षटक पूर्ण केल्यानंतर तो अचानक मैदान सोडून बाहेर पडला. अल्झारी जोसेफ मैदान सोडून जाईल याबद्दल कोणालाही माहिती नव्हतं त्यामुळे त्याच्या जागी बदली खेळाडूही मैदानात आला नाही.
हेही वाचा – Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
अल्झारी जोसेफ अचानक मैदान सोडून गेल्याने त्याच्या जागी इतर कोणता खेळाडू मैदानात आला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजला पुढच्या षटकात १० खेळाडूंसह खेळावे लागले. मात्र, अवघ्या एका षटकानंतर अल्झारी पुन्हा मैदानात परतला. संपूर्ण सामन्यात त्याने १० षटके टाकली आणि ४५ धावांत २ विकेट घेतले.
पुढचे षटक टाकण्यासाठी जोसेफ आला नाही, तर बदली क्षेत्ररक्षक हेडन वॉल्श जूनियर मैदानावर येण्यास तयार झाला. ते षटक संपल्यानंतर अल्झारी मैदानात परतला असला तरी त्याला कर्णधाराने गोलंदाजी करण्याची संधी दिला नाही. पण त्यानंतर बाराव्या षटकात जोसेफ पुन्हा गोलंदाजीसाठी आला.