Alzarri Jospeh Banned by Cricket West Indies: वेस्ट इंडिज वि इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विडिंज संघाने विजय नोंदवला. पण या मालिकेतील तिसरा सामना चांगलाच लक्षात राहण्यासारखा आहे. या सामन्यात अल्झारी जोसेफ आणि संघाचा कर्णधार शे होप यांच्यात वाद झाला होता. अल्झारी जोसेफ या वादानंतर थेट मैदानाबाहेर निघून गेला होता आणि त्यामुळे संघाला १० खेळाडूंसह खेळावे लागले. आता अल्झारी जोसेफला हा राग चांगलाच महागात पडला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने अल्झारी जोसेफवर कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफवर कारवाई केली आहे. ब्रिजटाऊन येथे इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कर्णधार शे होपशी मैदानावरील वादानंतर रागाच्या भरात कोणालाही न सांगता तो मैदानाबाहेर गेला होता. या प्रकरणी आता अल्झारी जोसेफला क्रिकेट वेस्ट इंडिजने दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

हेही वाचा – Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ

इंग्लंडच्या डावाच्या चौथ्या षटकात जॉर्डन कॉक्सविरुद्ध फिल्ड सेटिंगबाबत जोसेफ नाराज होता. अल्झारी जोसेफच्या मते त्याच्या गोलंदाजीवर त्याला दोन स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक नको होते. अल्झारी प्रत्येक चेंडूनंतर कर्णधाराला फिल्डबाबत सांगत होता पण कर्णधाराने मात्र फिल्ड सेटिंग बदलली नाही. यानंतर त्याने कॉक्सला धोकादायक बाऊन्सरने बाद केलं. कॉक्सला बाद केल्यानंतर जोसेफने आनंद साजरा केला नाही आणि कर्णधार होपशी वाद घालू लागला.

हेही वाचा – IND vs SA: भारत-आफ्रिका टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? पहिल्या-दुसऱ्या सामन्याच्या वेळा वेगवेगळ्या, वाचा सविस्तर

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी सीमारेषेजवळ आले आणि गोलंदाजाला त्यांनी हातवारे करत शांत राहण्याचा सल्ला दिला. तगोलंदाजाने विकेट मेडन षटक पूर्ण केले आणि नंतर मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला. यामुळे विंडीज संघाने १० क्षेत्ररक्षकांसह एक षटक खेळले.

अल्झारी जोसेफ आणि कर्णधाराच्या प्रकरणाबाबत क्रिकेट वेस्ट इंडिजचे क्रिकेट संचालक माइल्स बास्कोम्बे म्हणाले, “अल्झारीचे वर्तन क्रिकेट वेस्ट इंडिजच्या मूलभूत मूल्यांना सुसंगत नव्हते. अशा वागण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि परिस्थितीचे गांभीर्य पाहता आम्ही निर्णायक कारवाई केली आहे.”

हेही वाचा – Ruturaj Gaikwad: “अपील करायला लाज वाटली पाहिजे…”, ऑस्ट्रेलियातून महाराष्ट्रासाठी धावून आला ऋतुराज गायकवाड, रणजीमधील कॅचचा व्हीडिओ केला शेअर

२७ वर्षीय वेगवान गोलंदाज जोसेफनेही आपल्या वर्तनाबद्दल जाहीर माफी मागितली आहे. “मी कर्णधार शे होप आणि माझ्या सहकारी खेळाडूंची माफी मागितली आहे. मी वेस्ट इंडिजच्या चाहत्यांचीही माफी मागतो. मला समजलं आहे की, एका छोट्याशा चुकीचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि मी सर्वांना निराश केले याबद्दल मला मनापासून खेद व्यक्त करतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alzarri jospeh banned for 2 matches by west indies cricket board for on field argument with wi captain shai hope vs england odi match bdg