श्रीराम मित्र मंडळ, डोंगरी या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या विभागीय खो-खो स्पध्रेत दादरच्या अमरिहद मंडळाने माहीमच्या बलाढय़ ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा १४-१२ असा धक्कादायक पराभव केला.
अमरिहदच्या प्रसाद राडियेने अष्टपलू खेळ करत एकहाती सामना फिरवला. त्याला अभिषेक कागडा व आदेश कागडा यांची मोलाची साथ लाभली; तर ओम समर्थतर्फे प्रयाग कनगुटकर व तन्मय पवार यांनी चांगला खेळ केला. तसेच विद्यार्थी क्रीडा केंद्राने युवक क्रीडा मंडळाचा १३-१२ असा रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात विद्यार्थीच्या यश चव्हाण, मयूर घोडगे व राहुल उईके यांनी दिमाखदार खेळ केला, तर युवकच्या तुषार चिखले व राजेश खेतले यांनी जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. श्री समर्थ व्यायाम मंदिरने विजय क्लबचा २ गुण व ६.२० मि. राखून पराभव केला. श्री समर्थच्या प्रणय मयेकर, वरुण पाटील व अनिश मळेकर यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले. सरस्वती स्पोर्ट्स क्लबने फादर अॅग्नेल या संघाचा २२-१५ असा पराभव केला. सरस्वतीच्या श्रेयस राऊळ, सचिन सोनार व मनीष पगार यांनी छान खेळ केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा