निवडीवरून वाद बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची आगामी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय चमूचा सदिच्छा दूत ( ब्रँड अॅम्बेसेडर) नेमणूक झाल्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नाही. सुरूवातीला भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने सलमानच्या निवडीवर आक्षेप घेतल्यानंतर रविवारी भारताचे महान अॅथलिट मिल्खासिंग यांनीदेखील या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. माझा सलमान खानला विरोध नसला तरी रिओ ऑलिम्पिकसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे होती, असे स्पष्ट मत मिल्खासिंग यांनी व्यक्त केले. योगेश्वर दत्त यानेदेखील शनिवारी या निर्णयाबद्दल ट्विटरवरून नाराजी व्यक्त केली होती. ‘ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होण्यात सलमानचे काहीही योगदान नाही. प्रत्येकाला चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा अधिकार आहे. परंतु ऑलिम्पिक हे चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम नाही, अशा शब्दांत योगेश्वर दत्तने आपली नाराजी व्यक्त केली होती. सदिच्छादूताची नक्की भूमिका काय असते असा सवालही योगेश्वरने उपस्थित केला होता. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सरदारसिंग, अभिनव बिंद्रा व मेरीकोम यांनी सलमानच्या निवडीचे समर्थन केले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भारतीय खेळाडुंमध्ये एकप्रकारे फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा