Ambati Rayudu and Dwayne Bravo to play for Texas Super Kings: मेजर लीग क्रिकेट स्पर्धेला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी टेक्सास सुपर किंग्जमध्ये चेन्नईचे स्टार अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्राव्होसह अनेक खेळाडू सहभागी होणार आहेच. आयपीएल २०२३ नंतर, अंबाती राडूने स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली, तर ड्वेन ब्राव्हो या हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. त्याचवेळी, हे दोन्ही खेळाडू या वर्षी अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.

ब्राव्हो आणि रायुडू व्यतिरिक्त, चेन्नईचे उर्वरित स्टार खेळाडू डेव्हॉन कॉनवे आणि मिचेल सँटनर देखील मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या सत्रात टेक्सास सुपर किंग्जकडून खेळतील. त्याचवेळी, चेन्नईच्या खेळाडूंशिवाय गुजरात टायटन्सचा फलंदाज डेव्हिड मिलरचाही टेक्सास सुपर किंग्ज संघात समावेश करण्यात आला आहे.त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे देखील टेक्सास सुपर किंग्जचे प्रशिक्षक असतील. फ्लेमिंग हे एसए टी-२० मध्ये जोहानबर्ग सुपर किंग्जचे प्रशिक्षकही होते. त्याच वेळी, टेक्सास संघाने आणखी स्टार खेळाडूंना संघाचा भाग बनवले आहे.

Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
fritz sinner advance to final in 2024 us open
सिन्नेरचा अंतिम फेरीत प्रवेश ; उपांत्य लढतीत ड्रॅपरवर मात; अमेरिकेच्या फ्रिट्झचे आव्हान
American Jessica Pegula advances to US Open women singles final sport news
पेगुलाची अंतिम फेरीत धडक, मुचोव्हावर मात; आता अरिना सबालेन्काचे आव्हान
Vitality Blast T20 Tournament No Ball Incident
Vitality Blast T20 : यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे अंपायरने दिला नो बॉल! क्रिकेटचा ‘हा’ नियम तुम्हाला माहित आहे का? पाहा VIDEO
Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी टेक्सास सुपर किंग्ज संघ –

रस्टी थेरॉन, लाहिरू मिलनताहा, सामी अस्लम, कोडी चेट्टी, सैतेजा मुकामल्ला, केल्विन सॅवेज, मिलिंद कुमार, कॅमेरून स्टीव्हनसन, झिया शहजाद, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायडू, डेव्हिड मिलर, जेराल्ड कोएत्झी, ड्वेन ब्राव्हो, डॅनियल सॅम्स, मिचेल सॅंटनर.

हेही वाचा – IND vs WI: “भारतीय संघात अहंकार…”; वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी सर अँडी रॉबर्ट्सची टीम इंडियावर टीका

सीएसके आयपीएलमध्ये पाचव्यांदा चॅम्पियन बनले –

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२३ मध्ये विजेतेपद पटकावले होते. हा संघ पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन ठरला. चेन्नईने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करत आयपीएल ट्रॉफी जिंकली.

मेजर लीग क्रिकेट १२ जुलैपासून सुरू होणार –

विशेष म्हणजे यावेळी मेजर लीग क्रिकेटचा पहिला हंगाम खेळला जाणार आहे. युनायटेड स्टेट्समध्ये खेळल्या जाणाऱ्या लीगला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. लीगचा पहिला सामना टेक्सास सुपर किंग्स विरुद्ध लॉस एंजेलिस नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. त्याच वेळी, स्पर्धेचा अंतिम सामना ३० जुलै, रविवारी खेळला जाईल.

हेही वाचा – Team India: भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह ‘या’ स्पर्धेतून करू शकतात पुनरागमन

मेजर लीग क्रिकेटमध्ये भाग घेणारे संघ –

१.टेक्सास सुपर किंग्स
२.एमआय न्यूयॉर्क
३.लॉस एंजेलिस नाइट रायडर्स
४.सिएटल ऑर्कास
५.वॉशिंग्टन फ्रिडम
६.सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स