चेन्नई : भारताचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने दोन महिन्यांतच निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचे ठरवले आहे. आगामी हंगामासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो उत्सुक आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या रायुडूने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु आता हैदराबादकडून पुन्हा खेळण्यासाठी त्याने हैदराबाद क्रिकेट संघटनेवर कार्यरत असलेल्या प्रशासकांना पत्र लिहिले आहे.‘‘रायुडूने त्याचा आधीचा निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी आपण उपलब्ध असल्याचे हैदराबाद क्रिकेट संघटनेला कळवले आहे,’’ अशी माहिती प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी दिली.

Story img Loader