Ambati Rayudu’s decision to play in CPL 2023 : भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) माजी फलंदाज अंबाती रायुडूने सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रिओट्ससोबत करार केला आहे, ज्यामुळे तो कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सहभागी होणारा देशातील दुसरा खेळाडू बनला आहे. अंबाती रायुडू आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळला होता. ईएसपीएनक्रिकइंफोच्या माहितीनुसार, अंबाती रायुडूला सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघाकडून ‘मार्की’ खेळाडू म्हणून करारबद्ध केले आहे.

आयपीएल २०२३ नंतर, ३७ वर्षीय खेळाडूने अमेरिकेतील सीएसकेच्याच्या मेजर क्रिकेट लीग (एमएलसी) साठी टेक्सास सुपर किंग्ज (टीएसके) या फ्रँचायझीशी करार केल्याचे उघड झाले होते. तथापि, रायडूने एमएलसीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) निवृत्तीनंतर लगेचच खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी ‘कूलिंग ऑफ पीरियड’ धोरण लागू करण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, बीसीसीआयने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

अंबाती रायुडूला सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यास, तो सीपीएलमध्ये खेळणारा प्रवीण तांबेनंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल. अंबाती रायुडू हा ६ वर्षे भारतीय क्रिकेट संघाचा भाग होता. पण तो या दरम्यान सतत टीम इंडियामध्ये आत-बाहेर होत राहिला. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत तो भारतीय संघाचा एक भाग म्हणून दिसला होता. पण शेवटच्या प्रसंगी निवडकर्त्यांनी त्याला विश्वचषक संघात स्थान दिले नाही आणि त्याच्या जागी थ्रीडी खेळाडूची निवड करण्याबाबत सांगितले.

हेही वाचा – IND vs IRE T20 Series : आयर्लंड दौऱ्यापूर्वी जसप्रीत बुमराह अडचणीत, कोच द्रविडनंतर आता लक्ष्मणचीही मिळणार नाही साथ!

यापूर्वी रायुडू भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकावर दिसत होता. मात्र निवडकर्त्यांनी त्याचे पत्ता कट केला. मात्र, नंतर निवडकर्त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली, तेव्हा चौथ्या क्रमांकाची अस्थिरता हे संघाच्या पराभवाचे मुख्य कारण मानले गेले. यावेळीही भारत चौथ्या क्रमांकावरील फलंदाज शोधत आहे. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संघ अडचणीत दिसत आहे.

Story img Loader