पदार्पणातच नाबाद अर्धशतक ठोकून अंबाती रायुडूने निवड समितीने ठेवलेला विश्वास सार्थकी लावला असून कारकीर्दीतील कठीण काळात मला सचिन तेंडुलकर आणि रॉबिन सिंग यांची मदत झाल्याचे त्याने सांगितले.
सचिन आणि रॉबिन यांची मला कारकीर्दीत चांगली मदत झाली. कारकीर्दीतील वाईट दिवसांमध्ये मला या दोघांनी चांगले मार्गदर्शन केले आणि त्यामुळेच मला त्यांचे आभार मानवेसे वाटतात, असे रायुडू म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘जर माझे मन आणि गोष्टी चांगल्या होत राहिल्या तर नक्कीच मी भारतीय संघात स्थान मिळवेन, असा मला विश्वास होता. मला संधी मिळाल्याबद्दल मी आनंदी आहे.’’ झिम्बाब्वे दौऱ्यातील पहिल्या सामन्यात रायुडूने ८४ चेंडूंमध्ये नाबाद ६३ धावांची खेळी साकारत कर्णधार विराट कोहलीबरोबर १५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ‘‘पदार्पण करताना मी थोडासा निराश आणि भावुक होतो. माझ्यासाठी हा एक अद्भूत अनुभव होता,’’ असे रायुडू म्हणाला.
तो म्हणाला की, ‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला कोहली हा सर्वोत्तम खेळाडू आहे. कोहलीने सर्वोत्तम खेळी साकारण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्यासाठी खेळणे फार सोपे केले होते.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा