MI vs UPW Updates in Marathi: वुमन्स प्रिमीयर लीग २०२५ आता अखेरच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे. येत्या १५ मार्चला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यात होणारे सर्व सामने प्रत्येक संघासाठी प्लेऑफ गाठण्याकरता महत्त्वाचे असणार आहेतय दरम्यान आज ६ मार्चचा सामना मुंबई इंडियन्स वि. युपी वॉरियर्ज यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात संघाची गोलंदाजा अमेलिया कर हिने ५ विकेट्स घेत इतिहास घडवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या युपीच्या संघाने वादळी फलंदाजी करत दणक्यात सुरूवात केली. पण मुंबई इंडियन्सने कमबॅक करत २० षटकांत ९ विकेट घेतले. ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वॉल यांनी वादळी फलंदाजी केली. युपीची नवी सलामीवीर जॉर्जिया वॉल पहिलाच वुमन्स प्रीमियर लीगमधील सामना खेळत आहे. तिने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.

ग्रेस हॅरिसने २५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २८ धावा केल्या,तर जॉर्जिया वॉलने ३३ चेंडूत १२ चौकारांसह ५५ धावांची शानदार खेळी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. युपीने आठव्या षटकात ७४ धावांवर १ विकेट गमावली. पण तरीही युपीचा संघ २० षटकांत ९ बाद १५० धावाच करू शकला.

ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वॉल बाद झाल्यानंतर युपीने झटपट विकेट गमावल्या. यादरम्यान मुंबईची गोलंदाज अमेलिया कर हिने ४ षटकांत ३८ धावा देत ५ विकेट्स घेतले आहेत, यासह मुंबई इंडियन्ससाठी ५ विकेट्स घेणारी ती पहिली गोलंदाज ठरली. अमेलिया केरशिवाय मुंबईकडून हॅली मॅथ्यूजने २ विकेट्स तर नताली स्किव्हर ब्रंट आणि पारूनिका सिसोदिया हिने प्रत्येकी १ विकेट गमावली आहे.

यासह युपी वॉरियर्जने मुंबईला विजयासाठी १५१ धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईकडून या सामन्यात सलामीसाठी हिली मॅथ्यूज आणि अमेलिया कर या जोडीला पाठवले होते. पण भारताने २४ धावांवर पहिली विकेट गमावली आहे. यानंतर आता नताली आणि हॅलीची जोडी मैदानावर आहे.