Amelia Kerr’s of Brisbane Hits being fined five runs for catching the ball with a towel : आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी खेळाचे सर्व नियम नीट समजून घेणे अपेक्षित असते, परंतु काही वेळा ते मैदानावर अशा काही किरकोळ चुका करतात की त्यांचे आणि संघाचेही नुकसान होते. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित महिला लीग महिला बिग बॅशमध्ये पाहायला मिळाली आहे. येथे ब्रिस्बेन हीटसाठी सहभागी झालेल्या अमेलिया केरमुळे तिच्या संघाला पाच धावांच्या पेनल्टीला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर ब्रिस्बेन हीटला या सामन्यातही पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला बिग बॅश लीग २०२३ चा सामना मंगळवारी ब्रिस्बेन हीट आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ब्रिस्बेन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. संघाला या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात अमेलियाचे महत्त्वाचे योगदान होते. तिने ४४ चेंडूंचा सामना करताना ६४ धावांची शानदार खेळी साकारली. या दरम्यान, तिच्या बॅटमधून १० चौकार आले. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सिडनी संघाने सहा गडी राखून विजय मिळवला.
ब्रिस्बेन संघाला ठोठावला दंड –
अमेलिया केरने १०वे षटक टाकायला आल्यानंतर एक किरकोळ चूक केली नसती, तर कदाचित तिचा संघ सामना जिंकला असता. या षटकात अमेलिया केरने टाकलेला चेंडू गार्डनरने लाँग ऑनच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यासाठी वेगवान धाव घेतली. गार्डनर दुसऱ्या धावेसाठी वळण्यापूर्वीच क्षेत्ररक्षकाने पटकन चेंडू अमेलियाकडे फेकला. इथेच तिची चूक झाली.
अमेलिया केरने क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडताना तिने हातात छोटा टॉवेल धरला होता. नियमांनुसार, क्षेत्ररक्षण करताना, आपण आपल्या हातांशिवाय इतर कोणत्याही वस्तूचा वापरून चेंडू थांबवू शकत नाही. अमेलियाच्या या चुकीमुळे संघाला पाच धावांची पेनल्टी मिळाली. जर या पाच धावा आल्या नसत्या, तर कदाचित तिचा संघ सामना जिंकला असता. कारण या सामन्यात विरोधी संघाला फक्त एक चेंडू शिल्लक असताना विजय मिळवता आला होता.
सिडनी सिक्सर्स संघ पाचव्या स्थानावर पोहोचला –
केरसाठी हा दिवस चांगला नव्हता, तिने तीन षटकात ३९ धावा दिल्या आणि तिला एकही बळी घेता आला नाही. जॉर्जी वॉलने दोन तर कर्णधार जेस जॉन्सननेही दोन बळी घेतले. मात्र, सिक्सर्सने सामना जिंकला. या विजयासह सिडनी सिक्सर्सने गुणतालिकेत पाचवे स्थान गाठले आहे. तर ब्रिस्बेन हीट १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. साखळी फेरीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक सामना खेळायचा आहे.