वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्दिला सुतजियादी यांनी अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे बोपण्णाने कारकीर्दीमधील मिश्र दुहेरी गटातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डेनसह खेळताना बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यानंतर पुढील दिवशीच बोपण्णा आणि एब्डेन हे मिश्र दुहेरीत आमनेसामने आले. या वेळी अधिक जोमाने खेळ करणाऱ्या बोपण्णाला बाजी मारण्यात यश आले. आठव्या मानांकित बोपण्णा-सुतजियादी जोडीने संघर्षपूर्ण लढतीत चौथ्या मानांकित एब्डेन-बार्बोरा क्रेजिकोवा जोडीला ७-६ (७-४), २-६, १०-७ असे पराभूत केले. ही लढत एक तास आणि ३३ मिनिटे चालली. आता उपांत्य फेरीत बोपण्णा-सुतजियादी जोडीसमोर यजमान अमेरिकेच्या डोनाल्ड यंग आणि टेलर टाऊंसएंड जोडीचे आव्हान असेल.

हेही वाचा >>>बांगलादेशविरूद्धच्या मालिकेपूर्वी BCCIकडून मोठे फेरबदल, निवड समितीविषयी घेतला महत्त्वाचा निर्णय

४४ वर्षीय बोपण्णाने या वर्षीच्या सुरुवातीला एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. आता वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीत जेतेपदाची बोपण्णाकडे संधी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: American open tennis tournament rohan bopanna aldila sutjiadi in semi final match sport news amy