Australian Open 2023:दुहेरी सामन्यात अॅलिसन रिस्के-अमृतराज आणि तिची जोडीदार लिंडा फ्रुहविर्तोव्हा खेळत असताना अचानक आलेल्या अंपायरच्या कॉलमुळे ते गोंधळून गेले. शुक्रवारी चालू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना चुकीच्या पद्धतीने एक पॉइंट देण्यात आला. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या नटेला डझालामिडझे आणि अलेक्झांड्रा पॅनोव्हा या रशियन प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या पॉइंट दरम्यान ‘माफ करा!’ असे स्पष्टपणे ओरडण्यासाठी अडथळा कॉल देण्यात आला होता.
रिस्के-अमृतराज यांनी माफी मागण्यापूर्वी तिच्या प्रतिस्पर्ध्याच्या शरीराला मारलेला चेंडू लागला. परिणामी, सामन्याचे चेअर अंपायर निको हेल्वर्थ यांनी अलेक्झांड्रा पॅनोव्हा आणि नटेला डझालामिडझे यांना पॉइंट दिला. हेलवर्थ म्हणाले की, “लेडीज आणि जंटलमन, रिस्के-अमृतराज यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे डझालामिडझे/पानोव्हा यांना पॉइंट दिला जात आहे.” यावर रिस्के-अमृतराज अंपायर हेलवर्थ यांच्यावर निशाणा साधताना म्हणाली, “जेव्हा प्रतिस्पर्ध्याला माझा चेंडू लागला, तेव्हाच मी सॉरी म्हणाले. मी मारताना तिला लागले नसते तर मी तिची माफी मागितली नसती. तो चेंडू तिच्या पायाला लागला होता, तिच्या हाताला किंवा रॅकेटला लागला नाही.”
यावर उत्तर देताना अंपायर म्हणतात, “मला जे दिसले नाही तर, मी त्या गोष्टीबाबत न्याय करू शकत नाही.” प्रत्यक्षात, अमेरिकन खेळाडूने चुकून तिच्या प्रतिस्पर्ध्याला दुस-या सेटच्या सुरुवातीला नेटवर मारले होते. चेंडूच्या जोरामुळे तो नेटवर परत आला आणि आघाडीचे पंच निको हेलवर्थ यांना विश्वास वाटला की रॅकेटने संपर्क साधला होता. रिस्के-अमृतराज आणि फ्रुहविर्तोव्हा यांनी प्रथम हेलवर्थ आणि नंतर पर्यवेक्षक केरिलिन क्रेमर यांच्याशी व्यर्थ वाद घातला, परंतु ते दोन्ही अंपायर एकत्र आल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. तरी त्यांनी अलेक्झांड्रा पॅनोव्हा आणि नटेला डझालामिडझे यांना ६-७ (४), ६-४, ७-५ ने पराभूत केले.
अमेरिकन टेनिसपटूने एका सुपरवायझरला बोलावले जो बिनधास्त होता, त्याने सांगितले की कॉल अंपायरने करायचा आहे. हे एकूण रिस्के-अमृतराज चांगलीच भडकली. यावर ती म्हणाली, “काय? मग अंपायर तिथे काय करत आहे? कॅरोलिन, हे फ**** हास्यास्पद आहे. या गोष्टी अजिबात अपेक्षित नव्हत्या. अंपायर झोपले आहे का? मी सॉरी म्हणणार नाही. मला खात्री आहे की तुम्ही जसे पाहता तसेच तुम्हाला दिसेल.” यालाच जोडून रिस्के-अमृतराज अंपायरची इज्जत काढत म्हणाली. “हे हास्यास्पद आहे. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे. लक्ष द्या यार. ते टेनिस १०१ आहे.”