ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांच्या अनुपस्थितीत अमितकुमार दहिया व बजरंग यांच्यावर जागतिक कुस्ती स्पर्धेतील पदकांसाठी भारताची मोठी भिस्त आहे. ही स्पर्धा १५ व १६ मार्च रोजी लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होत आहे.
भारतीय कुस्ती महासंघाने सुशील व योगेश्वर या दोघांनाही आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या दोघांच्या अनुपस्थितीत भारतीय मल्लांना पदक मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतीय संघात अमितकुमार दहिया (५७ किलो), बजरंग (६१ किलो), रजनीश (६५ किलो), अमित धानकर (७० किलो), प्रवीण राणा (७४ किलो), पवनकुमार (८६ किलो), सत्यव्रत (९७ किलो), कृष्णनकुमार (१२५ किलो) यांच्यावर भारताच्या आशा आहेत. या खेळाडूंबरोबर प्रशिक्षक म्हणून अनिल मान, अनिलकुमार व विनोदकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक विनोदकुमार म्हणाले, सुशील व योगेश्वर यांची अनुपस्थिती आम्हाला जाणवणार नाही. आमच्या खेळाडूंनी चांगला सराव केला असून जागतिक स्पर्धेत ते घवघवीत यश मिळवतील. सुशील व योगेश्वर यांनी २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकनंतर एकाही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. आहेत. सुशील हा ७० किलो गटात तर योगेश्वर ६५ किलो गटात सहभागी होईल.
सुशील, योगेश्वरची माघार
ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांच्या अनुपस्थितीत अमितकुमार दहिया व बजरंग यांच्यावर जागतिक कुस्ती स्पर्धेतील पदकांसाठी भारताची मोठी भिस्त आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-03-2014 at 01:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit dahiya to lead indian challenge in wrestling world championship