आशिया चषकात बुधवारी (७ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानच्या या विजयानंतर भारताचे आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, या सामन्यादरम्यान माजी क्रिकेटपटू अमित मिश्राने पाकिस्तानी अभिनेत्रीच्या ट्वीटला दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आले.
हेही वाचा – Virat Kohli Century : विराटची अफाट कामगिरी! अफगाणिस्तानविरोधात झळकावलं ७१वं शतक
पाकिस्तान-अफगाणिस्तान सामना सुरू झाल्यावर अमित मिश्राने ट्वीट करत अफगाणिस्तान जिंकला तर आठवडाभर अफगाणी चाप खाईन, असे ट्वीट केले. या ट्वीटला पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने उत्तर दिले. गरीब मिश्राला आता संपूर्ण आठवडा शेण खावे लागेल, असे ती म्हणाली.
या ट्वीटला उत्तर देताना अमित मिश्राने माझा पाकिस्तानात येण्याचा कोणताही विचार नाही, असे प्रत्युत्तर दिले. मिश्राचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले असून त्यानंतर अनेकांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल केले.
दरम्यान, अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना अफगाणिस्तानने जिंकला असता, तर भारताचे आशिया चषकातील आव्हान टीकून राहिले असते. मात्र, पाकिस्तानने हा सामना जिंकत अंतिम फेरी आपले स्थान पक्के केले. त्यामुळे भारताचे आणि अफगाणिस्ताानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.