Amit Mishra Statement on KL Rahul: आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स संघाकडून खेळणारा भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राने आयपीएल कर्णधार केएल राहुलबद्दल मोठे वक्तव्य केले. पुढील हंगामात केएल राहुलला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते असा खळबळजनक खुलासा त्याने केला आहे. इतकंच नाही तर मिश्राने असेही म्हटले आहे की, राहुल (KL Rahul) पुढील हंगामात संघात नसण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२४ दरम्यान, संघाचे मालक संजय गोयंका लखनऊच्या खराब कामगिरीबद्दल केएल राहुलसोबत वाद घालताना दिसले होते. मात्र, नंतर दोघेही एकत्र दिसले होते. आता अमित मिश्राने दिलेल्या मुलाखतीत थेट म्हटले आहे की, संघ आता कर्णधार म्हणून एका चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे.

हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?

केएल राहुल-संजीव गोयंका यांच्यातील चर्चेवर अमित मिश्रा काय म्हणाला?

मिश्रा त्याच्या वक्तव्यात म्हणाला की, “संघ मालक निश्चितपणे रागावले होते. आम्ही गेले दोन सामने अतिशय वाईट रीतीने हरलो होतो. KKR विरुद्ध, आम्ही ९०-१०० धावांनी हरलो होतो आणि SRH विरुद्ध, सामना १० षटकांत संपला होता. आम्ही जणू काही त्यांना नेटमध्ये गोलंदाजी करत आहोत असे वाटले. ज्याने एखाद्याने संघात पैसे गुंतवले आहेत त्याला राग येणार नाही का?”

“गोयंका सामन्यानंतर केएल राहुलसोबत बोलत होते, ही फार मोठी गोष्ट नव्हती. पण मला नंतर कळले की ते म्हणाले की, गोलंदाजी खूपच खराब होती आणि संघाने थोडीशी झुंज द्यायला हवी होती. तुम्ही पूर्णपणे शरणागती पत्करली आहे असे दिसत होते. खरंतर लोक आणि मीडियाने हे विनाकारण उचलून धरले” असं मिश्रा पुढे म्हणाला.

हेही वाचा – IND vs ZIM: एका चेंडूत १३ धावा! यशस्वी जैस्वालचा दुर्मिळ विक्रम, T20I च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

KL Rahul लखनऊ सुपर जायंट्स संघ सोडणार?

अमित मिश्रा म्हणाला की आयपीएल कर्णधाराने भारतीय टी-२० संघाचा भाग असणं आवश्यक नाही, परंतु खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅट समजून घेणे आणि टी-२० संघातील खेळाडू असणे आवश्यक आहे. LSG ने त्यांच्या पहिल्या दोन हंगामात (२०२२ आणि २०२३) प्लेऑफ गाठले होते.

अमित मिश्राने केएल राहुलबद्दल सांगताना मुलाखतीत म्हटले की, “तो भारतीय संघात आहे की नाही याने काही फरक पडत नाही. पण ट्वी२० क्रिकेटसाठी आवश्यक अशी मानसिकता असलेला खेळाडू कर्णधार असावा. जो संघासाठी खेळतो तो खेळाडू कर्णधार असावा. मला खात्री आहे की LSG एक चांगला कर्णधार शोधेल. “

हेही वाचा – VIDEO: “कर्णधारपद आणि प्रसिद्धी मिळताच विराट बदलला, पण रोहित…” अनुभवी फिरकीपटू नेमकं काय म्हणाला?

राहुलच्या नेतृत्वाखाली, लखनऊ आयपीएल २०२४ मध्ये सातव्या स्थानावर होता. IPL 2024 मध्ये गोयंका आणि केएल राहुल यांच्यातील चर्चेचे वादात रूपांतर झाले होते. आता अमित मिश्राच्या या वक्तव्याने लखनऊ फ्रँचायझी पुढच्या हंगामासाठी काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.