संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या अमोल काळे यांची गुरुवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली.

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Dissolves NCP Beed Unit
राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ex cm prithviraj chavan refuse to accept congress state president post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच कायम;पृथ्वीराज चव्हाणांचा नकार
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम
BJP maharashtra Working president Ravindra Chavan
Ravindra Chavan: रवींद्र चव्हाण यांची अखेर भाजपाच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी वर्णी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांची घोषणा
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Image Of Ramesh Bidhuri.
आधी मंत्रिपद हुकले आता उमेदवारी रद्द होण्याची शक्यता; प्रियांका गांधी, अतिशींविरोधातील वादग्रस्त विधाने रमेश बिधुरींना भोवणार?

‘एमसीए’च्या बहुचर्चित निवडणुकीमध्ये सहसचिवपदी दीपक पाटील आणि मुंबई प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अध्यक्षपदी विहंग सरनाईक यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत मुंबई क्रिकेट गट, म्हाडदळकर गट आणि शरद पवार-आशीष शेलार पवार गट रिंगणात असल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे होती. अखेर पवार-शेलार गटाने वर्चस्व राखले.

अध्यक्षपदासाठी मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात चुरस असल्याचे दिसून आली. अखेर काळे यांनी १८३-१५८ अशी बाजी मारली. सचिवपदासाठी अजिंक्य नाईक, मयांक खांडवाला आणि माजी अध्यक्ष रवी सावंत यांचे सुपुत्र नील सावंत यांमध्ये तिरंगी लढत होती. अजिंक्य नाईक यांनी २८६ गुणांसह विजय नोंदवला. खजिनदारपदी अरमान मलिक आणि जगदीश आचरेकर यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मलिक यांनी आचरेकर यांच्यावर १६२-१६१ असा विजय मिळवला.

कार्यकारिणी परिषद सदस्यपदाच्या नऊ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मिलिंद नार्वेकर (२२१ मते), नीलेश भोसले (२१९), कौशिक गोडबोले (२०५), अभय हडप (२०५), सूरज समत (१७०), आमदार जितेंद्र आव्हाड (१६३), मंगेश साटम (१५७), संदीप विचारे (१५४), प्रमोद यादव (१५२) या उमेदवारांनी विजय मिळवले.

निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या चारही पक्षांचे नेते एकत्र येऊन एकाच शरद पवार-आशीष शेलार गटातून लढले. राजकीय मैदानावर एकमेकांचे विरोधक असलेले हे नेते क्रिकेटसाठी एकमेकांचे समर्थक बनल्याने ‘एमसीए’ निवडणुकीने सर्वाचे लक्ष वेधले होते.

या दिग्गजांचे मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार प्रताप सरनाईक, माजी क्रिकेटपटू सुलक्षणा नाईक, प्रवीण अमरे, माजी अध्यक्ष विजय पाटील, माजी क्रिकेटपटू डायना एडल्जी, बलिवदर सिंग संधू ,साईराज बहुतुले, नीलेश कुलकर्णी, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, ‘बीसीसीआय’चे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष आशीष शेलार, भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार, खासदार राहुल शेवाळे, माजी कसोटीपटू लालचंद राजपूत, आमदार सचिन अहिर, खासदार रामदास आठवले, भारताचे माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी मतदानाचा हक्क बजावला.

ठाकरेंची अनुपस्थिती

‘एमसीए’ निवडणुकीसाठी राजकारणातील विरोधक एकत्र आले खरे, पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदानासाठी उपस्थिती दर्शवली नाही.

पराभूत होणारे पाटील चौथे क्रिकेटपटू

‘एमसीए’ अध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत होणारे संदीप पाटील चौथे क्रिकेटपटू ठरले. याआधी माधव मंत्री  (१९९१, मनोहर जोशींविरुद्ध), अजित वाडेकर (२००१, शरद पवारांविरुद्ध) आणि दिलीप वेंगसरकर (२०११, विलासराव देशमुखांविरुद्ध) यांचाही अध्यक्षपदाच्या लढतीत पराभव झाला होता.

‘एमसीए’ अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. हा विजय संपूर्ण शरद पवार-आशीष शेलार गटाचा आहे. आता मोठी जबाबदारी आली असून खूप काम करायचे आहे. मुंबई क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यात शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. 

अमोल काळे, नवनिर्वाचित अध्यक्ष ,एमसीए

Story img Loader