Indian Women’s Cricket Team Coach: दिग्गज क्रिकेटपटू अमोल मुझुमदार भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी सज्ज झाला आहे. सोमवारी, क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) मुंबईत निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मुलाखतीत मुझुमदार यांनी सीएसी सदस्य अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांना त्यांच्या ९० मिनिटांच्या सादरीकरणाने प्रभावित केले आहे. मुझुमदार यांच्याशिवाय डरहमचे प्रशिक्षक जॉन लुईस आणि तुषार आरोठे यांची देखील मुलाखत घेण्यात आली.

आरोठे यापूर्वी महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. भारतीय महिला संघ या महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. बीसीसीआयला त्याआधी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची नियुक्ती करायची आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रमेश पोवार यांना मुख्य प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले होते. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. मुझुमदार कधीही भारताकडून खेळू शकला नाहीत, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या १४ हजारांहून अधिक धावा आहेत.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Shreyas Iyer to captain Mumbai Team in Syed Mushtaq Ali Trophy Prithvi Shaw included in Squad Ajinkya Rahane
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या खांद्यावर ‘या’ संघाने कर्णधारपदाची दिली जबाबदारी! अजिंक्य रहाणेही अय्यरच्या नेतृत्त्वाखाली खेळणार
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
mp shahu chhatrapati announce india alliance support to rajesh latkar independent candidate of kolhapur north assembly constituency
कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार
After withdrawing Satej Patil called for maintaining Chhatrapati Shahu Maharajs honor ending controversy
सतेज पाटील यांच्याकडून वादावर पडदा
sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
pandharpur vitthal darshan
कार्तिकी वारीनिमित्त विठ्ठलाचे २४ तास दर्शन ! सावळ्या विठुराया भक्तांसाठी उभा

मुझुमदारच्या सादरीकरणाने सीएसी सदस्य खूश झाले

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “अमोलच्या सादरीकरणाने सीएसी सर्वात प्रभावित झाले. मुझुमदार त्याच्या महिला संघासाठीच्या योजनांबाबत अगदी स्पष्ट होता. इतर सादरीकरणेही चांगली होती, परंतु मुझुमदार सर्वोत्कृष्ट होते. त्यांची या पदासाठी निवड होऊ शकते.” मुझुमदार हे मुंबई रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील आहेत आणि त्यांनी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघासोबत काम केले आहे. मुलाखतीदरम्यान सीएसीसमोर वैयक्तिकरित्या हजर राहणारे ते एकमेव व्यक्ती होते.

मुझुमदार यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यास त्यांची पहिली नियुक्ती ९ जुलैपासून सुरू होणारा बांगलादेश दौरा असेल. भारतीय महिला संघ मीरपूरमध्ये तीन टी२० आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. चांगल्या स्थितीत असतानाही टीम इंडियाने गेल्या पाच वर्षांत काही महत्त्वाचे सामने गमावले आहेत. तसेच, अद्याप कोणीही विश्वचषक जिंकलेला नाही.

हेही वाचा: Ashes2023: इंग्लंडच्या कर्णधाराची उडवली खिल्ली, बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियन माध्यमांना दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “हा मी अजिबात…”

मुझुमदार यांचा करार दोन वर्षांसाठी असू शकतो

मुझुमदार यांना दोन वर्षांचा करार मिळण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. यादरम्यान त्याच्याकडून पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाला टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी स्थितीत असतानाही पराभव पत्करावा लागला होता. बाद फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक होती, हे लक्षात घेऊन नवीन मुख्य प्रशिक्षकाचे काम खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीत सुधारणा करण्याबरोबरच त्यांच्या मानसिक कणखरतेवर काम करणे असेल.

मुझुमदार यांना त्यांच्या कामाची स्पष्ट कल्पना आहे

बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “या संघाला पुढील स्तरावर पोहोचण्यासाठी काय करावे लागेल याची मुझुमदार यांना पूर्ण जाणीव आहे. यामध्ये महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या फिटनेसमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संघातील काही खेळाडूंना प्रत्यक्षात त्यांच्यावर काम करण्याची गरज आहे. मुझुमदार यांनी मानसिक प्रशिक्षक आणि इतर सपोर्ट स्टाफच्या गरजेवरही भर दिला. महिला क्रिकेटच्या पुढील दोन आयसीसी स्पर्धा भारतीय उपखंडात होणार आहेत. हे देखील मुझुमदार यांच्या बाजूने आहे.”

हेही वाचा: IND vs WI: वर्ल्डकपमधून बाहेर पडताच आता भारताविरुद्ध बदला घेण्यासाठी वेस्ट इंडीज टीम सज्ज; ‘हा’ दिग्गज खेळाडू झाला संघाचा मार्गदर्शक

२०२५ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे

पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाव्यतिरिक्त, भारत सप्टेंबर २०२५ मध्ये महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “मजुमदार यांनाही भारतीय उपखंडातील परिस्थितीत खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.” मुझुमदारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १७१ सामन्यांमध्ये ४८.१३च्या सरासरीने ११,१६७ धावा केल्या. त्याच वेळी, लिस्ट-ए मध्ये त्याने ११३ सामन्यात ३८.२०च्या सरासरीने ३२८६ धावा केल्या. मुझुमदारने १४ टी२० सामन्यात १७४ धावा केल्या. मात्र, इतक्या धावा करूनही तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. मुझुमदारने फर्स्ट क्लासमध्ये ३० शतकं, ६० अर्धशतकं, लिस्ट-एमध्ये तीन शतकं, २६ अर्धशतकं आणि टी२० मध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे.